Jalna Districtजालना जिल्हाराज्य

अभ्यासा अभावी पहिले भागवत 11 दिवस वाचणाऱ्या भागवताचार्यांच्या 43 वर्षांतआठशे भागवत कथा – चंद्रकांत दायमा यांनी घेतलेली विशेष मुलाखत

जालना- प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठेतरी सुरुवात करावीच लागते आणि त्यासाठी कोणीतरी निमित्त मात्र ठरतं! असंच एक व्यक्तिमत्व वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य रामदास आचार्य महाराज यांच्यासाठी ठरलं आहे आणि ते म्हणजे जालना शहरातील स्टील उद्योगात नाव असलेल्या एस.आर. जे.पित्ती कंपनीच्या तत्कालीन मालकीण स्वर्गीय ताराबाई पित्ती. श्रीराम मंदिर संस्थान आनंदवाडी जालना येथे विश्वस्त म्हणून कार्यरत असलेले रामदास महाराज यांनी गेल्या 43 वर्षांपासून भागवत कथा सांगण्यास सुरुवात केली सध्या त्यांचे आठशेवे भागवत मंदिरामध्ये सुरू आहे या विक्रमी कथेबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थान गोंदवले यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला नेमका त्यांचा प्रवास कसा झाला आणि 800 भागवत वाचण्यापूर्वी त्यांनी सुरुवात कशी केली याविषयी चंद्रकांत दायमा यांनी त्यांची विशेष मुलाखत Edtv News साठी म घेतली आहे.

या मुलाखतीमध्ये रामदास महाराज असं सांगतात, त्यांच्याकडे वडिलांपासूनची भागवताची परंपरा आहे. ती सुरू असतानाच कोणतीही तयारी नसताना, त्यांच्या संमतीशिवाय स्व. ताराबाई  पित्ती यांनी 1980 मध्ये याच मंदिरामध्ये रामदास महाराज आचार्य यांना भागवत कथा सांगण्याची गळ घातली, परंतु कोणतीही तयारी नसताना सात दिवसात संपणारे हे भागवत अभ्यासा अभावी अकराव्या दिवशी संपवावे लागले आणि रामदास महाराजांना भागवताचार्य म्हणायला कारणीभूत ठरल्या त्या स्व. ताराबाई पित्ती. फक्त भागवत वाचून उपयोग नाही तर ते शास्त्रोक्त पद्धतीने, ज्ञान संपादन करून, अभ्यास करून दृष्टांत देऊन ते भक्तांच्या गळी उतरावे लागते. त्यासाठीचे जे शिक्षण आहे ते त्यांनी परतूर तालुक्यात  असलेल्या सावरगाव येथील श्री. चतुर्वेदेश्वर धाम ही संस्था स्थापन करणाऱ्या महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्याकडून. स्व.ताराबाई पित्ती यांनी गळ घातली ,यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी ज्ञान दिले आणि सद्गुरु प्रल्हाद महाराज रामदासी साखरखेर्डा यांनी आशीर्वाद देऊन ते पूर्ण करून घेतले त्यामुळे आज आठशेवे भागवत सांगत, असल्याचेही महाराज सांगत होते.

श्रीराम संस्थान बद्दल सांगताना महाराज म्हणाले संस्थानला कुठल्याही प्रकारचे शेती किंवा इतर उत्पन्न नाही. केवळ भक्तांच्या जीवावरच हे संस्थान चालू आहे. दास नवमीच्या काळात रामदासी, भिक्षेकरी जी भिक्षा आणतात त्यावर तसेच भाविकांनी दिलेल्या देणगीवर आणि दानपेटीवरच संस्थांनचा पूर्ण खर्च चालतो. वर्षामध्ये पाच मोठे उत्सव असतात त्यापैकीच एक रामनवमीचा उत्सव असतो. यावेळी10 दिवस  रोज हजारो भक्तांना अन्नदान केल्या जाते. परंतु कधीही अन्नाची कमतरता भासत नाही, हा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष महाराज उपस्थित असल्याचीच अनुभूतीच आहे असेही ते सांगतात.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button