Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा; समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आमरण उपोषण

जालना- ब्राह्मण समाजाची दिवसेंदिवस खालावत चाललेली परिस्थिती आणि केवळ दबलेल्या समाजातील घटकांना शैक्षणिक आरक्षणातून संधी मिळत असल्यामुळे ते मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकले, याउलट आज ब्राह्मण समाजातील सामाजिक स्थर चांगला असताना देखील ब्राह्मण समाज दुर्बल घटक ठरलेला आहे. त्यामुळे या घटकाला उंचावण्यासाठी आर्थिक मदतीची प्रचंड गरज आहे. म्हणून ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास घटकातील तरुणांना व्यावसायिक मदतीसाठी “परशुराम आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करावे आणि 1000 कोटींची तरतूद करण्यात यावी .या प्रमुख मागणीसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने दीपक रणनवरे यांनी आज दिनांक 28 रोजी जालना येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

मुंबई येथे धरणे आंदोलन करून तसेच अन्य वेळी शासनाला वारंवार निवेदन देऊनही ब्राह्मण समाजाच्या पदरामध्ये फक्त आश्वासनाशिवाय काहीच पडले नाही ,त्यामुळे आता ठोस निर्णय घेतल्याशिवाय उपोषण मागे घेतल्या जाणार नाही असा इशारा दीपक रणनवरे यांनी दिला आहे .दरम्यान आज वरील प्रमुख मागणीसह ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे, या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात व वस्तीगृह उभारावे, पुरोहितांना मासिक  5000 रुपये मानधन देऊन त्यांची विविध मंदिरात नियुक्ती करण्यात यावी, परंपरागत राज्यातील मंदिरे ज्या- त्या पूर्ववत वंशपरंपरागत व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात यावीत जेणेकरून मंदिराचे पावित्र्य व व्यवस्थापन सुस्थितीत राहील या आणि अन्य मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

जालना शहरातील थोर विचारवंत आणि महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आज या उपोषणाची सुरुवात करण्यात आली. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून मान्यवर समाज बांधवांची उपस्थित होती त्यामध्ये विश्वजीत देशपांडे पुणे, वर्षा रामदासी औंढा,धनंजय कुलकर्णी केज श्रीकांत जोशी आकोला, आशोक वाघ जळगाव इश्वर दिक्षित,शाम कुलकर्णी गंगाखेड, मंदार कुलकर्णी परभणी प्रविण जोशी पाथरी, यांच्यासह जालना शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
-www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button