Jalna Districtजालना जिल्हा

अवकाळी मुळे नुकसान झालेल्या पिकांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कडून पहाणी

जालना- मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा, ज्वारी, कापूस आदी सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा नैसर्गिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने निर्माण झालेली परिस्थिती जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे यांच्या कानावर घातली. याची तात्काळ दखल घेऊन त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाहणी करण्याचे सांगितले.

त्यानुसार त्यांनी उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासह तातडीने बदनापुर तालुका राजेवाडी शिवारातील  देवचंद सुंदर्डे, रूपसिंग सुंदर्डे आदींच्या शेतात जाऊन ज्वारी, मोसंबी आदी पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संघटक श् घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम , श्री वसिम देशमुख, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण आदींची उपस्थिती होती.

यावेळी शेतकऱ्याशी संवाद साधताना अनेक शेतकरी म्हणाले की, शासनाकडून केवळ घोषणा होतात. मात्र प्रत्यक्ष मदत मिळत नाही. दुष्काळ जाहीर होऊनही अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. तसेच 25% विमा अग्रीम रक्कम मिळालेली नाही असे सांगत त्यांनी आपल्या अनेक व्यथा मांडल्या.

यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण यांनी त्यांच्यासमोर जिल्ह्यातील एकंदरीत चित्र मांडले. यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, आजच मी विभागीय आयुक्त यांची भेट घेणार आहे. तसेच आगामी नागपूर अधिवेशनातही यावर आवाज उठवून शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी तालुकाप्रमुख श्री. अंकुश शिंदे, परमेश्वर मात्रे, शिवाजी मदन, मिर्झा अमजद बेग, दगडू पवार,अनिस शेख, अच्युत अंभोरे, नंदू अंभोरे, अंबरसिंग गुसिंगे, रामप्पा अंभोरे, बळीराम कोल्हे, गणेश अंभोरे, अंकुश वाघ, विष्णू गारखेडे, बाळू कांबळे, सुभाष अरसुळ, गजानन बोंद्रे, सुरेश घोरपडे, राजा शेख, किशोर मदन, सचिन अरसूड आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button