Jalna Districtजालना जिल्हा

लाच देखील संयुक्त; जिल्हा परिषद आणि सामान्य रुग्णालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले

जालना- दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एका शिक्षकाचे वैद्यकीय बिल काढण्यासाठी लाच मागणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक विभागातील वर्ग तीनच्या एका वरिष्ठ सहाय्यकाला आणि सामान्य रुग्णालयामधील शस्त्रक्रियागार परिचर म्हणून कार्यरत असलेल्या वर्ग चारच्या एका कर्मचाऱ्याला आज जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये सायंकाळी रंगेहात पकडण्यात आले आहे . शिवदास मोतीराम राठोड आणि दीपक प्रभाकर भाले अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत यासंदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक विभागातील एका शिक्षकाच्या पायाची शस्त्रक्रिया ऑक्टोबर 2021 मध्ये झाली होती. याचा खर्च चार लाख 61 हजार 412 रुपये वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात ऑगस्ट 2022 मध्ये सादर करण्यात आला होता. परंतु तेव्हापासून या देयकामध्ये काही ना काहीतरी त्रुटी दाखवत हे देयक प्रलंबित ठेवण्यात आले. त्यामुळे वैतागलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी लाच मागितल्याची पंचासमक्ष खात्री केली आणि सापळ्याचे नियोजन लावले.

आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक शिवदास मारुतीराम राठोड ,वय 52 वर्ष राहणार शांती निकेतन कॉलनी ,संभाजीनगर यांनी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती .त्यापैकी पाच हजार रुपये हे काम झाल्यानंतर देण्याचे ठरले आणि वीस हजार रुपये घेताना त्यांना रंग हात पकडले. याचवेळी सामान्य रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियागार परिचर म्हणून सोरटी नगर येथे राहणाऱ्या वर्ग चार चे कर्मचारी दीपक प्रभाकर भाले वय 59 यांनी स्वतःसाठी पाच हजारांची लाच मागितली तडजोडी आणती 3000 रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोघांनाही पकडले आहे. या दोघांचीही चौकशी करून कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button