Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

दिनविशेष; विचारांचा “दिव्यांगपणा” कमी करा आणि वारसा जपा- दृष्टहीन निकेश मदारे यांचे आवाहन

जालना- वेगळेपण दाखविल्याशिवाय समाज जवळ करत नाही, त्यामुळे केवळ शरीरानेच दिव्यांग नव्हे तर विचाराने दिव्यांग असणाऱ्यांनीही आळस झटकावा आणि विचारांचा वारसा जपावा. असे आवाहन जन्मजातच दृष्टहीन असलेल्या निकेश मदारे यांनी केलं आहे .

आज 3 डिसेंम्बर, जागतिक दिव्यांग दिन, या दिनाचे औचित्य साधून ईडीटीव्ही न्यूज या ऑनलाइन न्यूज पोर्टलला मुलाखत देताना श्री .मदारे बोलत होते. स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी झाली त्यावेळी भारतातील प्रमुख पाच वाक्यांमध्ये निलेश मदारे हे एक व्यक्तिमत्त्व होतं .जन्मजातच दृष्टीहीन असतानाही त्यांनी सर्व अडचणींवर मात करत पीएचडी पदवी मिळविण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. आणि ज्या शाळेत ते शिकले त्याच शाळेत आज ब्रेल लिपी आणि आठवी दहावीच्या मुलांना इतिहास शिकवत आहेत.

जालना शहरात असलेल्या गुरु गणेश दृष्टीहीन विद्यालयात त्यांचे पाचवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना इतर ठिकाणी राहायचं काम पडलं प्रत्येक ठिकाणी जिज्ञाशो वृत्तीने शिक्षकांकडून समजून घेतलं कारण दिसत काही नव्हतंच केवळ कानाच्या भरोशावरच त्यांना राहावं लागलं. सध्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे जे वातावरण आहे त्याबद्दल मात्र त्यांनी खंत व्यक्त केली आहे निकेश मदारे म्हणतात की आजच्या तरुणांकडे जीवन जगण्याचे ध्येय नाही त्यांच्याकडे विचारांचा वारसा नाही आणि समाजामध्ये ज्याप्रमाणे शरीराने दहा टक्के दिव्यांग आहेत त्याचप्रमाणे हे तरुण विचारणे दिव्यांग झाले आहेत त्यामुळे त्यांनी हा दिव्यांगपणा झटकावा आणि थोर विचारवंतांचे स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आत्मसात करावेत आणि त्यामधून आपल्या अंगातील वेगळं पण दाखवावं कारण जोपर्यंत आपण वेगळं पण दाखवत नाही तोपर्यंत समाज आपल्याला जवळ करत नाही असा अनुभव देखील त्यांनी सांगितला आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w                                                App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button