Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

ब्राह्मण समाजाच्या उपोषणाला उपमुख्यमंत्र्यांकडून सातव्या दिवशी “चॉकलेट”

जालना -परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, आणि 1000 कोटींची तरतूद करावी .या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यासंदर्भात समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने जालना येथे दीपक रणनवरे हे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.

जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेआ. कैलास गोरंट्याल यांच्यासह काही नेत्यांनी भेट घेऊन हे उपोषण सोडवण्याची विनंती केली होती. केवळ आश्वासन देऊन दीपक रणनवरे यांना उपोषणापासून उठवण्याचाच हा प्रयत्न होता. परंतु ब्राह्मण समाजाच्या पाठिंब्यामुळे आज सातव्या दिवशी देखील दीपक रणवरे यांचे आमरण उपोषण सुरूच आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काही क्षणासाठी दीपक रणनवरे यांच्याशी संपर्क साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील लोकांनी काल रविवार दिनांक तीन रोजी इथे धरणे आंदोलन केले होते आणि आपला पाठिंबाही दिला होता. आजही विविध जिल्ह्यातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन पाठिंबा दिला आहे. दरम्यान उपोषण मागे घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांना मध्यस्थीसाठी आज पाठवले होते, परंतु ही मध्यस्थी देखील निष्फळ ठरली आहे. अवघ्या काही क्षणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी” आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे ,मी अतुल सावे यांना सांगतो ,आपण उपोषण मागे घ्या,” असे म्हणत असतानाच फोन कट झाला .त्यानंतर लगबगीने जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयातून प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप द्वारे पत्रही धडकले. परंतु या पत्रामध्ये केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत दिनांक 13 रोजी नागपूर येथे बैठक लावण्यात आली आहे आणि उपोषण मागे घ्यावे एवढाच मजकूर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चॉकलेट दाखवून उपोषणाच्या ठिकाणाहून दीपक रणनवरे यांना उठविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केला गेला आहे. पत्रामध्ये  कोणत्या ब्राह्मण समाजाच्या घटकाला, ,शिष्टमंडळाला या बैठकीत चर्चेसाठी बोलावले आहे याचा स्पष्ट उल्लेख नाही, त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसण्याचा हा प्रयत्न केला गेला असल्याची भावना या समाजामध्ये आता वाढीस लागली आहे. दरम्यान उद्या दिनांक पाच रोजी समाज बांधवांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असा पवित्रा दीपक रणनवरे यांनी घेतला.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button