Jalna Districtजालना जिल्हा

उच्चभ्रू वस्तीत भर दिवसा कानाला पिस्टल लावून चोरी; आपण या चोरांना पाहिलंत का?

जालना -नवीन जालना भागातील गणपती नेत्रालयासमोर असलेल्या सोमेश रेसिडेन्सी या उच्चभ्रू वस्तीमध्ये आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे तीन लाखांच्या जवळपास सोने चांदी आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास यंत्रणा कामाला लावली आहे. नवीन जालना भागातील  सोमेश रेसिडेन्सी मध्ये आलिशान बंगले आहेत आणि सर्वजण उद्योगपती आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास या परिसरात सामसूम असते. याचाच फायदा घेत स्व. सुशील शर्मा यांच्या घरी त्यांचा मुलगा यश शर्मा त्यांची आई कविता शर्मा आणि यशची अजित ताराबाई शर्मा हे तिघेजण राहतात. दरम्यान यश शर्मा हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी गेटमधून घरात प्रवेश केला आणि वरच्या मजल्यावरचे दार लोटलेले असल्यामुळे ते उघडे करून मुख्य घरामध्ये प्रवेश केला. दरम्यान घरच्यांना वाहनाचा चालक आला असावा  असावा असा अंदाज व्यक्त करत त्यांनी फारसे काही लक्ष दिले नाही. तोपर्यंत दोन चोरटे घरामध्ये घुसले आणि सासु- सुनेच्या कानाला पिस्टल लावत, रोख रक्कम आणि सोने चांदीचे दागिने देण्याची मागणी करू लागले न दिल्यास जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या. हे करत असतानाच एकाने घरामधील सर्व ड्रॉवर्स, देवघरात असलेले ड्रॉवर्स आणि अन्य काही साहित्य उचकटून टाकले आणि सोने-चांदी रोख रक्कम असा सुमारे तीन ते पाच लाखांचा ऐवज पळून नेला आहे. ही उच्चभ्रू वस्ती ही  असल्यामुळे पूर्ण कॉलनीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत असे ,असतानाही या चोरांचे हे धाडस पाहून परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button