“या” ग्रामपंचायती ठरल्या स्वच्छतेच्या मानकरी; मिळवला पुरस्कार
जालना-शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावाच्या विकासाबरोबरच प्रत्येक गावाने स्वच्छतेवरही भर द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने श्री. आर्दड बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कारप्राप्त सरपंचांना शुभेच्छा देऊन विभागीय आयुक्त श्री. आर्दड म्हणाले की, निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय केवळ बांधून ठेवू नये, त्याचा वापर होणेही आवश्यक आहे. त्याचबरोबर घरासोबतच आपले गावही स्वच्छ राहिल, याची दक्षता घ्यावी. जालना जिल्हा गतीने विकासाकडे वाटचाल करीत आहे. हा जिल्हा प्रामुख्याने स्टील व सीडस उद्योगाने ओळखला जातो. आता सिल्क अर्थात रेशीम शेती व त्यावरील प्रक्रीया उद्योगाकडे जिल्हा झेप घेत आहे. रेशीम प्रक्रीया उद्योगासाठी आवश्यक सहकार्य निश्चितपणे केले जाईल,अशी ग्वाहीही यावेळी विभागीय आयुक्तांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती निरंतर चालणारी प्रक्रीया आहे, त्यामुळे आपले गाव नेहमीच स्वच्छ राहिल, यावर गावांनी भर द्यावा. गावाच्या विकासासाठी नवीन उपक्रमही राबवा. इतर कचऱ्यासोबतच प्लास्टीक निर्मुलनावर भर द्यावा. सांडपाणी, घनकचरा यावर उपायासाठी चांगला परिपूर्ण आराखडा सादर करावा.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेने प्रभावीपणे काम केले असून या मिशनमध्ये जालना जिल्हा आघाडीवर आहे. यावर्षी दिलेले उद्दिष्टही वेळेत पूर्ण केले जाईल. हर घर जल या उपक्रमाचीही जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. कामे गुणवत्तापूर्ण होतील, यावर प्राधान्याने भर दिला जात आहे. स्वच्छतेकडे गावांनी विशेष लक्ष द्यावे. सरपंचांनी सर्वसामावेशक असाच घनकचऱ्याचा आराखडा सादर करावा, अशी सुचनाही त्यांनी केली. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी भगवान तायड यांनी केले.
कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी (सा ) राजेंद्र तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं ) अंकुश चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व) बालचंद जमधडे, मुख्य वित्त व लेखाधिकारी राजेंद्र सोळुंके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( बालकल्याण) कोमल कोरे, समाजकल्याण अधिकारी तथा गट विकास अधिकारी ज्योती राठोड, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, मंगल धुपे, कार्यकारी अभियंता विद्या कानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास सर्व गट विकास अधिकारी, तालुका गटशिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी,सीडीपीओ,याची उपस्थिती होती. सूत्रसंचलन जिल्हा कार्यक्रम अधिकारी नम्रता गोस्वामी यांनी केले.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२०-२१ व २०२१-२०२२ जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
तालुक्याचे नाव, ग्रामपंचायतीचे नाव,रक्कम, प्राप्त क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. बदनापूर – कंडारी बू ५,०००००/-प्रथम, जालना – मानेगाव जहागीर ३,०००००/-द्वितीय, जालना-तांदुळवाडी २,०००००/-तृतीय, अंबड-सुखापुरी २५,०००/-स्व वसंतराव नाईक पुरस्कार (सांडपाणी व व्यवस्थापन), मंठा– तळेगाव २५०००/- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन ), जाफ्राबाद – जानेफळ पंडीत २५०००/-स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व व्यवस्थापन )
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२०-२१ व २०२१-२०२२ अंतर्गत जिल्हा परिषद गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
तालुक्याचे नाव, जिल्हा परिषद गटांचे नाव, पारितोषिक प्राप्त जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतीचे नाव पुढीलप्रमाणे आहे. पुरस्काराची रक्कम प्रती गाव रु.50,000/- आहे जाफ्राबाद-अकोलादेव – नांदखेडा, टेंभूर्णी – टाकली /गारखेडा, कुंभारझरी-मंगरुळ, माहोरा -जानेफळ पंडीत, वरुड बु – वरुड बु, परतूर – वाटूर –वैजोडा, आष्टी-ब्राम्हनवाडी, कोकाटे हदगाव –आसनगाव, सातोना –उस्मानपुर, पाटोदा हातडी.
बदनापूर –शेलगाव –मात्रेवाडी, रोषणगाव –वरुडी, बावणे पांगरी -धामनगाव , गेवराई बाजार -कंडारी बू, दाभाडी –सागरवाडी. अंबड – शहागड-पाथरवाला बू., गोंदी -कोठाळा खू , साष्ट पिंपळगाव –आपेगाव, धाकलगाव –सुखापुरी, पारनेर –गोविंदपुर, जामखेड-पागीरवाडी, रोहिलागड –चिकनगाव,ताड हदगाव –वलखेडा. जालना –सेवली -वरखेड सेवली , नेर-नेर, रामनगर-मानेगाव ज, भाटेपुरी –थेरगाव, रेवगाव -तांदुळवाडी बू, पीर कल्याण -नाव्हा, वाघ्रूळ जा- कुंभेफळ सिंदखेड , मौज पुरी – दहिफळ,देव मूर्ती – सिंधी काळेगाव.मंठा – तळणी- कानडी, खोराड सावंगी – नायगाव, जयपूर – तळेगाव, पांगरी गोसावी- बरबडा, केंधळी- गेवराई भोकरदन –वाल सावंगी- जयदेववाडी, पारध -पद्मावती, जळगाव सपकाळ – भोरखेडा, अन्वा -अन्वा पाडा, भायडी – वालसा वडाळा, आव्हाना -आव्हाना,सोयगाव देवी -तांदूळवाडी,हसनाबाद – चिंचोली , राजूर – चांदई टेपली, तळेगाव – पळखेडा दाभाडी, नळणी बु-नळणी बु. घनसावंगी -रांजणी – कंडारी परतूर, राणी उंचेगाव – अंतरवाली राठी, म. चिंचोली – मासेगाव, कु. पिंपळगाव -मूर्ती,तीर्थपुरी,भोगगाव,आंतरवाली टेंभी -राजा टाकळी,गुरु पिंप्री-राजेगाव,पिंपरखेड- खडका वाडी.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172