“त्या” तळ्याने पुन्हा घेतला पंधरा वर्षीय बालकाचा बळी
जालना-दोन वर्षांपूर्वी एका ट्रॅक्टर चालकाचा बळी घेतल्यानंतर त्याच तलावाने पुन्हा एका पंधरा वर्षीय बालकाचा बळी घेतल्याची दुर्घटना आज दुपारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या तळ्यात घडली आहे.
चंदनझिरा भागात राहणारा वैभव गणेश कावळे (वय१५) हा मुलगा आज दुपारी काही मित्रांसह नागेवाडी शिवारातील आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या एका तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असतांना पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही माहिती कळताच चंदनझिरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह तलावातून बाहेर काढला.
दरम्यान याच तलावात दोन वर्षांपूर्वी ट्रॅक्टर चालकाचा बुडून मृत्यू झाला होता तलावाच्या काठावर शेताची दुरुस्ती करण्यासाठी आलेले ट्रॅक्टर हे या तलावामध्ये पडले होते या ट्रॅक्टर सोबतच ट्रॅक्टरचा चालक ही तलावात पडला त्यामुळे चालकाचा बळी गेला होता.
वैभव कावळे चंदनझिरा परिसरात असलेल्या एका शाळेत 9 वीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे समजते.
या घटनेची बातमी कळताच चंदनझिरा भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.याप्रकरणात डॉ. सोमनाथ मदन यांच्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172