Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

पालकांनो सावधान! शासनाच्या डोक्यात शिजला आहे विद्यार्थ्यांना मांसाहारी बनवण्याचा “अंडे का फंडा”

जालना- पालकांनो सावध व्हा !तुम्ही जर शुद्ध शाकाहारी असाल आणि तुमचा पाल्य शाळेत शिकत असेल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. शासनाने जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आता अंडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये दरी तर निर्माण होईलच परंतु तुमचे घर देखील मांसाहारी व्हायला वेळ लागणार नाही. विद्यार्थ्यांपर्यंत अंडी पोहोचविणारी यंत्रणा जी आहे ती म्हणजे शाळा ,या शाळेचे देखील काय मत आहे, हेही आपण जाणून घेतले आहे आणि शासनाच्या या “अंडे का फंडा” या धोरणाला कडाडून विरोध केला आहे त्यामुळे लवकरच हा निर्णय अंड्यांप्रमाणे सडून जाईल अशी शक्यताही निर्माण झाले आहे.

शासनाने दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी शालेय पोषण आहार विभागाच्या वतीने आणि महाराष्ट्राचे सहसचिव ई.मु. काझी यांच्या सहीने एक निर्णय जाहीर केला आहे .या निर्णयात म्हटले आहे की अंड्यामधील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी व अंडी उत्पादक शेतकऱ्यांना राज्यांतर्गत स्थानिक बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहारामध्ये अंड्यांचा समावेश करण्याची विनंती कृषी विभागाने केली आहे. अंड्यांचे उच्च प्रतीचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्वे, लोह कॅल्शियम असल्याने पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शालेय व्यवस्थापन आणि पालकांमध्ये चांगला संताप उफाळला आहे. कारण शाळेमध्ये शिकणारे सर्वच विद्यार्थी मांसाहारी असतील असे नाही, त्यामुळे शुद्ध शाकाहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गळचेपी होणार आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण देखील होणार आहे. शिवाय ही अंडी उकडण्यासाठी कुठलीही वेगळी यंत्रणा, वेगळे स्वयंपाक घर, वेगळा कर्मचारी देण्यात आलेला नाही, त्यामुळे खिचडीच्याच पातेल्यामध्ये अंडी शिजवली तर इतर मुले ही खिचडी खातील का? हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. तसेच जी मुले मांसाहार करत नाहीत अशी मुले मांसाहारी मुलांसोबत जेवतील का ?अनेकांना मांसाहारामुळे उलट्या देखील होतात. त्यावेळी उद्भवणाऱ्या या अडचणीचा सामना कसा करायचा. आतापर्यंत हे सर्व विद्यार्थी एकत्र बसून खिचडी खात होते .हे चित्र अंडी दिल्यानंतर शाळांमध्ये दिसेल का? अशा एक ना अनेक प्रश्नांची निर्मिती शासनाच्या या मांसाहारी धोरणामुळे निर्माण झाले आहे. शाळा व्यवस्थापनने शासनाचा आदेश असल्यामुळे या प्रकाराला विरोध केला नाही मात्र हा निर्णय राबविणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो .त्यामध्ये पहिली ते पाचवी पर्यंत 100 ग्राम तांदूळ, 20 ग्राम डाळ ,पाच ग्राम तेल, मीठ चवीनुसार, आणि अडीच ग्राम मसाला याचा समावेश आहे . पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हे प्रमाण वाढवून दिले आहे .हे साहित्य पाहता अंड्यापेक्षाही जास्त प्रोटीन्स या साहित्यामध्ये असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे या अंड्यांची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करून शासनाच्या डोक्यात शिजलेला हा अंडे का फंडा जबरदस्तीने शाळेवर लादला तर उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button