मुलाने केला पित्याचा खून?
जालना -शहरातील गांधीनगर परिसरा असलेल्या अक्सा मस्जिद जवळ मुलानेच पित्याचा खून केल्याची दुर्घटना आज सकाळी घडली.?
या मस्जिद परिसरात एका छोट्याशा घरात इब्राहिम मुबारक खान वय 60 वर्ष हे आपल्या परिवारासह राहत होते .दरम्यान आज सकाळी त्यांचा मुलगा शाहरुख खान याने इब्राहिम खान हे बाथरूम मध्ये असताना त्यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार केले ?यामध्ये इब्राहिम खान हे गंभीर जखमी झाले घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली आहे. दरम्यान उपचारासाठी इब्राहिम यांना सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचे समजते. याप्रकरणी इब्राहिम मुबारक खान यांचा मुलगा शाहरुख खान आणि शाहरुख खान ची पत्नी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .इब्राहिम खान हे वाहन चालक होते आणि किरायाची गाडी घेऊन ते वाहन चालवत होते.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172