“या” कारणामुळे झाली गजानन तौर याची हत्या ?समर्थकांची सीआयडीमार्फत चौकशीची मागणी: विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
जालना; मंठा तालुक्यात पाईपलाईनच्या घेतलेल्या कोट्यावधींच्या कामामधून गजानन तौर यांची हत्या झाल्याचा संशय तौर यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांना निवेदन देऊन सीआयडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
अहमदनगर नेवासा भागातील गजानन तौर यांच्या समर्थकांनी आज जालन्यात येऊन तौर यांच्या काही स्थानिक नातेवाईकांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यामध्ये उर्वरित आरोपींना त्वरित अटक करावी आणि तौर यांची हत्या करणारे या आरोपींच्या पडद्यामागे कोण आहे? यांचा खरा सूत्रधार कोण आहे? तो शोधून काढावा. अशी मागणीही करण्यात आली आहे निवेदनावर संजय मच्छिंद्र तौर, रेखा महेश तौर,निलेश सरोदे, नितीन पगारे, संदीप घोडके, यांच्यासह्या आहेत.
===================================
अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आज अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172