एस.आर.पी.चा जवानच करतो पिस्टल ची विक्री?गुन्हा दाखल
जालना- जालना शहरात वाढती गुन्हेगारी आणि सहजासहजी मिळणारे गावठी पिस्तूल याचे कनेक्शन पाहता पोलिसांनी पहिल्यांदाच एवढी मोठी मोहीम हाती घेतली आहे आणि पिस्तूल विक्रीचा शोध घेतला असता राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच एस .आर .पी .चा जवानच हे पिस्तूल विकत असल्याची माहिती पिस्तूल घेणाऱ्या ग्राहकानेच पोलिसांना दिली आहे.
गेल्या तीन दिवसांमध्ये जालना शहरातून आठ पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया करण्याचा सपाटा लावला आहे.
नुकतीच गजानन तौर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती .त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन खडबडून जागी झाले आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या पिस्तुलाचा सुगावा लावण्यासाठी चंग बांधला .विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील देवमूर्ती येथील विठ्ठल पंडितराव जाधव वय 43 वर्ष यांच्या घरी धाड टाकली. यामध्ये विठ्ठल जाधव यांच्या घरी एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांच्या हाती लागले आहेत. विठ्ठल जाधव यांना स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन सविस्तर चौकशी केली असता त्याने हे पिस्तूल राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच एस आर पी च्या जवानाकडून विकत घेतल्याचे सांगितले .बबन उर्फ विशाल वाघ असे या एसआरपीच्या जवानाचे नाव आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कर्मचारी रुस्तुम जैवाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यामध्ये एस आर पी चा जवान बबन उर्फ विशाल वाघ आणि विठ्ठल जाधव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल जाधव हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दुसरा आरोपी बबन वाघ याला मात्र अद्याप पर्यंत ताब्यात घेण्यात आले नाही.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==