स्वागत समारंभात सूट-बूट घालून आलेल्या चार भामट्यांनी पळवली 30 तोळ्याच्या दागिन्यांची पर्स
कोल्हापूर – लग्न आणि स्वागत समारंभाला सुरुवात झाली आहे .या सुरुवातीसोबतच भामट्यांचा ऊर्जित काळही आला आहे. त्यामुळे लग्नात किंवा स्वागत समारंभामध्ये अनोळखी चेहऱ्यांची विचारपूस करायचे टाळू नका. अन्यथा तुमचे दागिने लंपास झालेच समजा.
कोल्हापूर येथे दिनांक 18 डिसेंबर रोजी मुस्कान लॉन मध्ये एका लग्नाचा स्वागत समारंभ होता .निमंत्रित पाहुण्यांप्रमाणेच सूटबूट घालून आलेल्या चार भामट्यांनी एका महिलेचे 15 लाख रुपयांचे तीस तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे हे चारही भामटे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये स्पष्ट दिसत आहेत सूटबूट घालून एक दुसऱ्याच्या संपर्कात राहिले आणि एक महिला वधू-वरांसोबत छायाचित्र काढण्यासाठी स्टेजवर गेले असता खुर्चीवर ठेवलेली पर्स या भामट्यांनी पळविली आहे त्यामुळे अनोळखी चेहऱ्यांना लग्नात चौकशी करायचे विसरू नका.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==