पानेवाडी च्या आठवडी बाजारात गोळीबार एक जण जखमी; गावकऱ्यांनी आरोपीला ठेवले बांधून; पिस्तुलासह जिवंत कडतुस जप्त
घनसावंगी- जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यात असलेल्या पानेवाडी या गावच्या आठवडी बाजारात आज दिनांक 21 रोजी दुपारी दोन वाजता एका तरुणाने गोळीबार केला. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला असून गोळीबार करणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी पकडून बांधून ठेवलेले होते.
पानेवाडी येथे आज आठवडी बाजाराचा दिवस .या बाजारात गावातीलच एक शिंदे नावाचा तरुण सुमारे बारा वाजल्यापासून पिस्तुलाचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. यातूनच त्याने एक गोळी देखील झाडली ती दुसऱ्या एका तरुणाला लागली. तो तरुण जखमीही झाला. ही दहशत पसरवत असतानाच त्याने आपला मोर्चा बस स्थानकाकडे वळवला. बस स्थानक परिसरात असलेल्या भगवान मापारे, अक्रोडभाऊ तिडके, आत्माराम चव्हाण, राम सावंत, नितीन शिंदे, यांच्यासह अन्य काही गावकऱ्यांनी गोळीबार करणाऱ्या या तरुणाला पकडल्याचे सांगण्यात येत आहे .तरुणाला पकडून बांधूनही ठेवले होते. काही वेळाने घनसांवगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि या गोळीबार करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले .तरुणांकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काढतूस जप्त करण्यात आले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172