गुंडांवर पोलिसांची दहशत पाहिजेच! पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे
जालना -जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून घडत असलेल्या घडामोडी आणि त्यातच आठ दिवसांपूर्वी गजानन तौर यांची झालेली हत्या या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे .मनोज जरांगे पाटील यांनी दिलेले अल्टीमेटम या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या रजा आणि सुट्ट्या रद्द करण्यात आले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून जालना जिल्हा विविध कारणांमुळे चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात, गजानन तौर यांच्या हस्ते संदर्भात देखील जालना जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर गाजत आहे. ठिकठिकाणी सापडत असलेले पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवारी ही एक धोक्याची घंटा वाजत आहे. सामान्य जनता भीतीच्या वातावरणात जगत आहे .ही सर्व भीती दूर करून गुंडांवर वर्चस्व मिळविण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम देखील हाती घेतली आहे. त्यामुळे ठीक ठिकाणी तलवारी आणि पिस्टल शोधून काढले जात आहेत. गुंडांवर पोलिसांची दहशत असलीच पाहिजे तरच सामान्य नागरिक शांततेने जगू शकेल असं मतही जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान गजानन तौर यांच्या हत्येनंतर पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आलेल्या बाबींमध्ये त्यांना फॉलो करणाऱ्यांच्या संख्येमध्ये तरुणांची संख्या प्रकर्षाने जास्त आहे .त्यामुळे तरुणांच्या पालकांना समजावून सांगण्यासाठी पोलीस प्रशासनाची यंत्रणा म्हणजेच पोलीस अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी हे विविध गावांना भेटी देऊन तरुणांना या क्षेत्रापासून वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत .एकंदरीत जालना जिल्ह्यामध्ये ढेपाळलेली कायदा व सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे .त्यामुळेच पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्टी वगळता इतर सुट्टी आणि रजा रद्द करण्यात आल्या असून कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172