मूल्यसंस्कारासाठी श्रमसंस्कार देणारी’ गुरुकुल’ विचारधारा जोपासावी – प्रा.बसवराज कोरे
जालना : समाजातील भवताल बदलत असताना युवापिढीवर मूल्यसंस्कार रुजवायचे असल्यास श्रमसंस्कार देणारी ‘गुरुकुल’ विचारधारा जोपासता आली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संस्काराचे वारकरी महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा.बसवराज कोरे यांनी साने गुरुजी जयंतीदिन समारंभात बोलताना केले.
देवगाव खवणे ( ता.मंठा) येथील ओंकारेश्वर आश्रम संस्कार प्रबोधिनी विद्यालयात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जालना आयोजित वंदनीय साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आणि हेलस साने गुरुजी कथामालेची तीन दशकांची वाटचाल निमित्त रविवारी ( ता.२४) संस्कार प्रबोधिनी गुरुकुलात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.,कार्यक्रमाचे उदघाटन संस्काराचे वारकरी महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगाव खवणे येथील ओंकारेश्वर आश्रमाचे महंत बालकगिरी महाराज हे होते. या वेळी महोत्सव समिती उपाध्यक्ष कल्पना दत्तात्रय हेलसकर, निमंत्रक डाॅ.सुहास सदाव्रते, प्रमुख कार्यवाह आर.आर.जोशी, डाॅ.यशवंत सोनुने, जगदीश कुडे, मुख्याध्यापक बाबासाहेब देशमाने यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा.कोरे म्हणाले,की आजची समाजाची परिस्थिती पाहता बालमनावर मोठे परिणाम होत आहे. मोबाईल, इंटरनेट सारखी माध्यमांचा वापर करताना युवापिढी किती गुंतत जाते यामुळेच संवेदना हरवत चालली असल्याचे सांगत प्रा.कोरे यांनी सांगितले, की युवापिढीवर मूल्यसंस्कार रुजवायचे असतील तर श्रमसंस्काराचे बीजारोपण कुटूंब व्हायला पाहिजेत,असेही प्रा.कोरे यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात बोलताना महंत बालकगिरी महाराज म्हणाले, की ग्रामीण भागात अध्यात्माचे शिक्षणाबरोबर वैज्ञानिक जाणिवा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे संस्कार प्रबोधिनी गुरुकुलातील विद्यार्थी कला,क्रीडा क्षेत्रात राज्य पातळीवरील स्पर्धेत यश मिळवितात,हीच आनंदाची बाब असल्याचे महंत बालक गिरी महाराज यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भूमिका विशद करताना कथामालेचे प्रमुख कार्यवाह आर.आर.जोशी म्हणाले,की यंदा साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आणि हेलस कथामाला शाखेची तीन दशकाची वाटचाल निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री.जोशी यांनी सांगितले. कार्यक्रमात जगदीश कुडे यांनी ओंकारेश्वर आश्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी केले . कार्यक्रमास धीरज महाराज तिजारे, पिंटू बोन्दे,विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, दत्तात्रय राऊतवाड, आर.पी.बोराडे,
मुख्याध्यापक बालासाहेब देशमाने, विष्णू आटोळे,सुरेश राठोड,गुलाब राठोड, सुरेश वैद्य यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमस्थळी ‘गुरुजींची साधना’ : साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या सुसंस्कार ग्रंथातील
कथांवर आधारित विशेष चित्रकथात्मक प्रदर्शन भरविण्यात आले होते.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172