छ. शिवाजी महाराजांच्या आरतीला आणि देशभक्तीच्या गाण्यांना “यशोयुतांम वंदे” चा साज
जालना : महाकवी,महानक्रांतीकारक, विज्ञाननिष्ठता, समाजसुधारक, जाज्वल्य राष्ट्रभक्ती विचारांची धगधगती ज्योत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गीतावर आधारित भरतनाट्यम ‘ यशोयुताम वंदे ‘ या कार्यक्रमाचा अनोखा साज देत सर्वच बाजूंनी एका वेगळ्या उंचीवर राष्ट्रपुरुष आणि देशभक्तांना पुन्हा एकदा सामान्यांसमोर इतिहास उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कार्यक्रमाने जालनेकरांना राष्ट्रभक्तीच्या विचारांची अनोखी पर्वणी दिली आहे.
पुणे येथील’ कलासक्त ‘ निर्मित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गीते व त्यावर आधारित भरतनाट्यम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रारंभी ‘ स्वतंत्रते भगवती..यशोयुताम वंदे ‘ प्रेरक भरतनाट्यम प्रारंभीच चैतन्याचा अनुभव रसिकांनी घेतला. कार्यक्रमात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यावरील ‘ जय जय देव जय शिवराया ‘ ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली आरती भरतनाट्यम नृत्याने सादर करण्यात आली. पंडीत हदयनाथ मंगेशकर यांनी स्वर साज चढविलेले आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या अजरामर स्वरांचे सावरकरांचे ‘ हे हिंदु नृसिह प्रभो शिवाजी राजा ‘ या नृत्यगीताने उपस्थितात उत्साह संचारला असल्याचा अनुभव रसिकांनी घेतला. रत्नागिरीत सावरकरांनी बांधलेले पतितपावन मंदिराचा संदर्भ देत समाजक्रांतीची साक्ष देणारे सावरकरांचे ‘ हे हिंदू जातीच्या देवा ‘ हे नृत्य गीत सादर झाले. स्वातंत्र्यवीर जेव्हा लंडन मध्ये गेले तेव्हा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकवला होता. अशा उदासिनता अवस्थेत सावरकरांनी लिहिलेले मातृभूमीला साद घालणारे ‘ ने मजसी ने मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ‘ या भरतनाट्यम गीताने उपस्थितांना भारावून टाकले. सावरकरांचे व्यक्तिमत्त्व शतपैलू, नाटककार, क्रांतिवीर, देशभक्त, हिंदू समाजाला एकत्र करणारे समाजसुधारक सावरकर यांनी लिहिलेले ‘ कमला’ महाकाव्य आहे. अंदमानातला राजबंदी काव्य तपस्वी सावरकर यांनी रचलेली उर्दूतील ‘ यही पाव रहे सकते, मै बंदा हू है हिंदुस्ता मेरा ‘ या गझलेने कार्यक्रमाची उंची गाठली होती. दोन जन्मठेपेची शिक्षा, कोलू फिरवणे अशा यातनेला मनोधैर्य शाबूत ठेवून आत्मबलाचा मंत्र सावरकरांनी दिला. अशा आशयाची रचना ‘ अनादी मी !, अनंत मी ! ‘ या गीतावर भरतनाट्यम नृत्याने रंगत वाढत गेली.
कार्यक्रमात शेवटी कलाकारांनी सादर केलेल्या ‘ वंदे मातरम ‘ या नृत्यगीतावर जालनेकर रसिकांनी ठेका धरला होता.
हे होते कलाकार-भरतनाट्यम नृत्य गीतातून अर्चना पुरंदरे, भाग्यश्री राव, प्राची नागरोळकर, स्वानंदी शुक्ला, विदिशा जोशी, सई आपटे, मिहिका पवार, अबोली धुमाळ, साक्षी पाटील, जान्हवी भागवत यांच्या भावस्पर्शी पदन्यासाला ‘ यशोयुताम वंदे’ कार्यक्रमात रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे निवेदन दीपा सपकाळ यांनी करीत विविध दाखले,संदर्भाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार उभे करण्याचा अनोखा अनुभव दिला.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172