गुणवत्ता ढासाळली; साडेचार महिन्यात दोन वेळा राष्ट्रध्वज बदलण्याची रेल्वे प्रशासनावर नामुस्की
जालना -जालना रेल्वे स्थानकाच्या समोर शंभर फूट उंचीवर डोलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत दिसत असल्यामुळे राष्ट्रभक्तांमध्ये संताप उसळत आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या ध्वजाचे अनावरण झाले होते. अवघ्या साडेचार महिन्यात दोन वेळेस हा राष्ट्रध्वज बदलावा लागला त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकेकाळी गुणवत्तेमध्ये रेल्वे प्रशासनाचे नाव घेतल्या जात होते मात्र आता गुणवत्ताहीन कामाचे नमुने समोर यायला लागले. आहेत थातूरमातूर रंगरंगोटी, डांबरी रस्ते 15 दिवसातच उखडणे, सिमेंट कामावर पाणी न मारणे अशी अनेक निकृष्ट दर्जाची कामे समोर यायला लागली आहेत. रेल्वेचे व्यवस्थापक यांनी महिनाभरापूर्वी जालना रेल्वे स्थानकाची 15 मिनिटात पाहणी आटोपली खरंतर ही पाहणी आटोपली नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांची दिशाभूल करून त्यांना ती उरकती घ्यायला लावली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अनेक निकृष्ट दर्जाच्या कामावर पडदा पडला आहे .आज रेल्वे स्थानकासमोरील फाटलेल्या अवस्थेतील राष्ट्रध्वज पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान मागील वेळी देखील राष्ट्रध्वज फाटला होता आणि त्यावेळी तो बदलला होता. सद्य परिस्थितीत पांढराशुभ्र दिसणारा रंग धुळीने माखल्यामुळे काळाकुट्ट झाला आहे. त्यातच तो फाटला देखील आहे. त्यामुळे याची गुणवत्ता काय असेल? हा प्रश्न न विचारलेलाच बरा.
दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या अभियांत्रिकी विभागाच्या वतीने या ध्वजाची खरेदी केल्या जाते आणि सुमारे 26 हजार रुपये या राष्ट्रध्वजासाठी मोजले जातात. अशी माहिती समोर आली आहे .त्यामुळे हा खर्च कोणासाठी केला जातो? आणि त्या बदल्यात किती गुणवत्ता मिळते हे तपासणी गरजेचे आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
16 ऑगस्ट ची बातमी
शंभर फूट उंचीवर फडकत आहे जालना जिल्ह्यातील पहिला “तिरंगा”
https://edtvjalna.com/?p=6486