“ते “दोन्ही झेंडे पहाटे पाच वाजता पोलीस बंदोबस्तात हटविले; पोलिसांची फौज तैनात.
जालना- जालना तालुक्यात असलेल्या खरपुडी गाव परिसरात जिल्ह्यातील एकमेव असलेले कृषी विज्ञान केंद्र आणि पार्थ सैनिकी शाळा विकसित झाली आहे .या दोन्ही प्रकल्पाच्या पाठोपाठ आता या परिसरामध्ये सिडको प्रकल्प येण्याच्याही हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या परिसरात असलेल्या सरकारी जागेवर आपला हक्क सांगणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे .यातूनच तीन दिवसांपूर्वी एक पंचरंगी झेंडा काढल्याच्या कारणावरून खरपुडी परिसरात तणाव वाढला होता. त्याच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक झेंडा होता हे दोन्ही झेंडे आज दिनांक पाच रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कडक पोलीस बंदोबस्तामध्ये हटविण्यात आले आहेत.
दरम्यान या झेंड्याकडे जाणारा रस्ता देखील पोलिसांनी खोदून बंद केला आहे. जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार तुषार निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू ,परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी वडते, यांच्यासह पोलिसांची मोठी कुमक यावेळी उपस्थित होती.
कोरोना महामारी येण्यापूर्वी या परिसरात सिडको प्रकल्प येण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या आणि त्या माध्यमातून काही व्यापाऱ्यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या होत्या .ज्या शेतकऱ्यांनी या जमिनी विकल्या त्या शेतकऱ्यांनी पुन्हा या जमिनीवर हक्क सांगितल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत ,आणि त्यातूनच व्यापाऱ्यांना जास्त फायदा होईल आणि त्या फायद्याचा वाटा आपल्याला मिळावा असे वाद या परिसरात उफाळायला लागले होते. तसाच काहीसा प्रकार आता इथे वाढायला लागला आहे आणि या परिसरात थोडी का होईना जमीन आपल्या ताब्यात कशी राहील असा सर्वांचाच प्रयत्न आहे. त्यामधून अशा सरकारी जागांवर झेंडे लावण्याचे प्रकार होत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आज महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोघांनी संयुक्त कारवाई करत खरपुडी रस्त्यावर असलेल्या सरकारी जागेवरील हे दोन्ही झेंडे काढले आहेत. खरंतर ग्रामपंचायत वगळता इतरांचा या जागेची काही संबंधही नाही परंतु गावातील चार-पाच लोक बाहेरून लोक आणून इथे आपला हक्क सांगत असल्याचा आरोप प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. दरम्यान आज पहाटे जरी हे झेंडे काढले असले तरी दिवसभर पोलिसांचा फौज फाटा येथे तैनात करण्यात आला आहे, आणि ते सर्व तयारीनिशी आज खरपुडी येथे ठाण मांडून आहेत. विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची आज येथे उल्लेखनीय संख्या आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
*पंचरंगी ध्वज पाडला; खरपुडी शिवारात तणावपूर्ण शांतता* https://edtvjalna.com/2023/7539/
*दिलीप पोहनेरकर*
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com