विद्युत कॉलनीतील”त्याच” कुंटणखाण्यावर पोलिसांची दुसरी धाड; मित्र उपसरपंच झाल्याचा आनंदोत्सवाचा गुलाल त्याने झटकला पोलीस कोठडीत
जालना- दोन महिन्यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी जुना जालना भागातील विद्युत कॉलनी भागात सुरू असलेल्या कुंटनखाण्यावर छापा मारून काही तरुणींना ग्राहकांसह ताब्यात घेतले होते. ही बाब ताजी असतानाच आज दि.5 रोजी पुन्हा एकदा कदिम जालना पोलिसांनी त्याच ठिकाणी छापा मारला,4 तरुण ताब्यात घेतले आहेत. परंतु एक तरुण व तरुणी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
दरम्यान घनसांवगी तालुक्यातील कवठाळा या गावचे पाच तरुण आपला मित्र उपसरपंच झाल्याच्या खुशीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जालन्यात चित्रपट पाहण्यासाठी आले होते. चित्रपट पाहण्यापूर्वी एका मित्राने आपली गाडी या कुंटणखान्याकडे वळवली त्यापैकी एक जण या घरामध्ये गेला आणि बाकी चार जण रस्त्यावरच बोलत उभे होते. पहिला बाहेर आल्यानंतर बाकीचे जाणार होते.परंतु तो बाहेर येण्यापूर्वीच बाहेरच्या चौघांमध्ये काहीतरी वाद सुरू झाला. या वादामुळे कॉलनीतील नागरिकांनी कदीम जालना पोलिसांना पाचारण केले .पोलीस निरीक्षक सय्यद मजहर हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात पोलिसांची गाडी आल्याचे लक्षात आल्यानंतर या घरातून एक तरुण व एक तरुणी संरक्षण भिंतीवरून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु उर्वरित चार जणांना कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्याकडून एम एच 02 यु व्ही 8 9 4 8 या रंगाचे एक चार चाकी वाहनजप्त केले आहे. ताब्यात घेतलेल्या चार जणांमध्ये एक माजी उपसरपंच देखील आहे. मित्र उपसरपंच झाल्याचा आनंदात उधळलेला गुलाल रात्री पोलीस कोठडीमध्ये झटकून टाकला.
*जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव *
गेल्या अनेक वर्षांपासून हा कुंटणखाना शिवनगर भागामध्ये राजरोसपणे सुरू होता. पोलिसांना माहिती देऊनही कारवाई होत नव्हती, त्यामुळे या कॉलनीतील रहिवाशांनी अधिकृतपणे लेखी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली. त्यानंतर आरोपीने तेथील कुंटणखाना बंद करून विद्युत कॉलनीत लगेचच एक घर घेतले आणि तिथे हा व्यवसाय सुरू केला. परंतु पोलिसांनी लगेच विद्युत कॉलनीत छापा मारला होता. या घराच्या बाजूलाच मुलींचे वसतिगृह आहे ,उच्चभ्रू वस्ती आहे, तसेच जवळच शाळा आणि महाविद्यालय देखील आहे ,त्यामुळे या कुंटणखाण्याचा परिसरातील सर्वच घटकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कदीम जालना पोलिसांनी वर्तवली होती आणि त्या अनुषंगाने या घराला “सील” लावावे असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. 13 डिसेंबरला पाठविलेल्या प्रस्तावावर अजूनही काहीच विचार न झाल्याने आज पुन्हा एकदा कॉलनीतील नागरिकांच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलिसांनी येथे छापा मारला आहे.
*महिला सुटते निर्दोष*
कुंटखाण्यामध्ये व्यवसाय करणारी महिला उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ती उपजीविका चालविण्यासाठी व्यवसाय करते या कारणामुळे तिच्यावर कोणतीच कारवाई होत नाही ,तसेच तिच्या अब्रूचे नुकसान होऊ नये म्हणून पोलीस देखील अशा महिलांची नावे जाहीर करत नाहीत पर्यायाने अशा महिलांची हिंमत आणि व्यवसाय देखील वाढत जातो.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com