Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

“संस्कारक्षम बना” पोलीस अधिकारी “ज्ञानदेवांचा” विद्यार्थ्यांना उपदेश

जालना -उच्च शिक्षणामुळे सर्वात मोठी अडचण येत आहे आणि ती म्हणजे विद्यार्थी मूळ शिक्षणापासून बाजूला सारल्या जात आहे. मूळ शिक्षण म्हणजेच “संस्कार” हे संस्कार शिकण्यासाठी मंदिर, मज्जित कीर्तनातच गेलं पाहिजे असे नाही तर बाहेरून देखील हे शिक्षण घेता येतं, आणि ते घेतलं पाहिजे ,असं मत सदर बाजार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव पायघन यांनी आज व्यक्त केले.” रेझिंग डे” अर्थात पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्याला भेट दिली आणि पोलिसांच्या कामकाजाची माहिती करून घेतली.

पोलीस आणि नागरिकांच्या कर्तव्याबद्दल श्री. पायघन यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच तुम्ही भारताचे भावी नागरिक आहेत, आणि तुमच्या हातात देशाचे भविष्य आहे हे. भविष्य उज्वल करण्यासाठी तुम्ही व्यसनापासून दूर राहिले पाहिजे, संस्कारक्षम झालं पाहिजे, त्यासोबत काही अनिष्ट रूढी प्रथांना फाटा देऊन एक सुज्ञ आणि देशभक्त नागरिक होण्यासाठी भावनिक न होता परिस्थितीला समजून घेणे, संयम ठेवणे, आणि किरकोळ गोष्टीकडे दुर्लक्ष करणे या बाबींवर भर दिला पाहिजे असेही श्री. पायघन म्हणाले. आज पोलीस ठाण्याचे कामकाज जाणून घेण्यासाठी आर .एच. व्ही. इंग्रजी माध्यम शाळेच्या इ. 10 वी च्या एकूण 124 शैक्षणिक भेट दिली


सी. जे. इंगळे, एन. एस. शेळके, व्ही. एम. गोलेच्छा, एस. एम. शहाणे, सारिका महाजन, शिल्पा अंबडकर, सुरेखा उपरे आदि शिक्षक उपस्थित होते.

 

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button