आयुर्वेदासोबत आधुनिकतेचि सांगड घाला- राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवादातील सूर
जालना -पारंपारिक आयुर्वेदिक उपचाराला आधुनिकतेची सांगड घाला! असा सूर एक दिवसीय राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवादात रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी निघाला. सर्वात जुनी उपचार पद्धती म्हणून आयुर्वेदालाच महत्त्व आहे. इतर झटपट परिणाम मिळणाऱ्या उपचार पद्धतीपेक्षा कायमस्वरूपी आजार बरा होण्यासाठी आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही. एवढेच नव्हे तर या उपचार पद्धतीमुळे शरीरावर इतर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. आजार समूळ नष्ट करण्यासाठी त्यामुळे गरजूंनि आयुर्वेदिक पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहनही या परिसंवादात करण्यात आले.
आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा प्रसार करण्यासाठी वैश्विक गुरुकुल परिवार महाराष्ट्राच्या वतीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देशभरातून सुमारे 2000 वैद्यांनी हजेरी लावली. वैद्य पंचकर्म शिरोमणी प्रभाकर नानाजी जोशी उर्फ नानाजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करून या परिसंवादाला सुरुवात झाली. यावेळी कन्याकुमारी येथील वैद्य एल महादेवान, धुळे येथील वैद्य प्रवीण जोशी, दिल्ली येथील वैद्य दिव्या कजारिया आणि बेंगलोर येथील वैद्य निशा मनीकांचन यांची उपस्थिती होती.
या परिसंवादामध्ये पारंपारिक आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती विषयी उहापोह झाला. त्यासोबत नवीन आलेले संशोधन आणि त्याच्या वापराविषयी प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले. आयुर्वेद चिकित्सा पद्धतीमध्ये विशेष काम केलेल्या देशभरातील काही निवडक वैद्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वैद्य सुधाकर मोहिते, श्याम भुतडा, आशुतोष गुप्ता, प्राचार्य मीनल ठोसर, सतीश भट्टड, दत्तात्रय दगडगावे, डॉक्टर नारायण जाधव आणि या परिसंवादाचे आयोजक वैद्य प्रवीण बनमेरू यांची उपस्थिती होती.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com