राजुरेश्वराचे दर्शन घेऊन परतणारे दोन गणेश भक्त अपघातात ठार; दोन जखमी
श्रीक्षेत्र राजुर- श्रीक्षेत्र राजुर येथून मध्यरात्री राजुरेश्वराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एकाच दुचाकी वरील चार जणांपैकी दोघेजण ठार झाल्याची दुर्घटना पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.
आज दि.10 अंगारकी चतुर्थी या निमित्त भोकरदन तालुक्यातील राजूर येथे असलेल्या श्री. राजुरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. बाहेरगावावरून भाविका येत असतील तर मग स्थानिक भाविक तरी कसे मागे राहणार? भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर येथून चार भाविक मध्यरात्री राजुरेश्वराच्या दर्शनासाठी एकाच दुचाकी वर चौघेजण गेले होते. रात्री दर्शन घेऊन परत येत असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास राजूर भोकरदन रस्त्यावर असलेल्या टेपले पेट्रोल पंपा समोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमध्ये हे चारही जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले .जखमींना राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या चौघांपैकी निलेश हिरालाल चव्हाण वय 20 वर्ष आणि प्रशांत आरके वय 21 वर्ष या दोघांनाही मृत घोषित केले आहे, तर अनिकेत बाळू वाहुळे व 19 आणि आरेफ सलीम कुरेशी वय 22 हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्रथमोपचार करून सुरुवातीला जालना आणि जालना येथून औरंगाबाद येथे हलविले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com