Jalna Districtजालना जिल्हा

पॅन कार्ड अपडेट करण्याची मोजावी लागली एक लाख 83 हजार रुपये किंमत; डॉक्टरची फसवणूक

जालना- मोबाईलवर आलेल्या अनोळखी एसएमएस ची लिंक ओपन केल्यामुळे एक लाख 83 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना काल दिनांक 9 रोजी जालन्यातील एका महिला डॉक्टर सोबत घडली.

शहरातील विवेकानंद हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेल्या डॉ. प्रियंका रमेश चांडक यांना काल दुपारी एक वाजेच्या सुमारास एका अनोळखी 98 0 22 77 450 या क्रमांकाच्या मोबाईल वरून एक मेसेज आला. या मेसेज मध्ये लिहिले होते “डिअर युजर्स एसबीआय नेट एसी बिल सस्पेंडेड टुडे प्लीज, अपडेट युवर पॅन कार्ड” असे म्हणत एक लिंक आली आणि या लिंक वर डॉ. प्रियंका चांडक यांनी पॅन कार्ड विषयी माहिती भरली. ही माहिती भरताच काही वेळातच त्यांच्या खात्यातून एक लाख 83 हजार 882 काढून काढून घेण्यात आले. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 420 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सदर बाजार पोलीस करीत आहेत.***

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button