दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याच्या भीतीने आरोपीचा डोके फोडून आत्महत्येचा प्रयत्न
जालना- पहिल्या एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना न्यायालयात नेतांना पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस ताब्यात घेतील या भीतीने एका आरोपीने पोलिसाला झुंगारा देऊन डोके फोडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न आज दि.10 रोजी सकाळी जिल्हा कारागृहासमोर केला.
दिवसांपूर्वी चंदनजिरा पोलिसांनी गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला बदनापूर तालुक्यातील खादगाव येथील आरोपी पप्पू कचरू घोरपडे वय 30 हा सध्या जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यासाठी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कारागृहातील अधिकाऱ्यांनी कारागृहातून बाहेर काढले, त्याच वेळी 2018 मध्ये एका गुन्ह्यात पप्पू घोरपडे याचे नाव असल्यामुळे स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी देखील त्याला ताब्यात घेण्यासाठी कारागृहासमोर हजर झाले होते. या अधिकाऱ्यांना पाहताच पप्पू घोरपडे यांनी पोलिसांपासून सुटका करून घेण्यासाठी पळ काढला आणि कारागृहाच्या कर्मचारी निवासस्थानाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून दगडावर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हाशाखेचे हवलदार भाऊराव गुलाबराव गायके वय 52 यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पप्पू कचरू घोरपडे याच्यावर पुन्हा एकदा आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com