Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

आता दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मिळणार तरुणांना नोकऱ्या;आजच मुलाखत आजच नोकरी

जालना-नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सन २०२३ या नविन वर्षात प्रत्येक महिन्याच्या दुस-या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात येत असून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांचे कार्यालयात जागेवर निवड संधी (प्लेसमेंट ड्राईव्ह) मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. याप्रमाणे जानेवारी महिन्यातील दिनांक 11 जानेवारी, 2023 बुधवार सकाळी 11 ते दु. 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे. यासाठी लक्ष्मी कॉटस्पीन, सामनगांव रोड जालना यांची आयटीआय फिटर/इलेक्ट्रीशियन साठी 10 पदे, आणि विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि.जालना यांची आयटीआय मशिनीस्ट/फिटर/ इलेक्ट्रीशियन साठी 10 पदे अशी एकूण २० रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. यासाठी नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे.

जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून प्रथम औरंगाबाद विभाग व नंतर जालना जिल्हा निवडून त्यातील SPECIAL JOB FAIR-1 (2022-23) JALNA याची निवड करावी. उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. सदर आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपस्थित असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ.कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत २ माळा, जालना येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या महापर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा असे आवाहन श्री संपत चाटे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी केले आहे.***

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button