Jalna Districtजालना जिल्हाराज्य

माँसाहेब जिजाऊंच्या जयंती निमित्त शाळांना सुट्टी व वाहतुकीतही बदल

जालना- माँसाहेब जिजाऊ यांची दिनांक 12 जानेवारीला जयंती आहे. आपल्या शेजारीच असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील आणि जालन्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर असलेल्या जिजाऊ तीर्थावर जिजाऊंना नमन करण्यासाठी असंख्य भाविक इथे येतात. त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टीही देण्यात आली आहे आणि वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या जारी केलेल्या या पत्रात म्हटले आहे की दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्या उत्सवानिमित्त जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंद्रीय प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्रशाला, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयंअर्थसाहित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंतर्गत शाळा व महाविद्यालयांना दिनांक 12 जानेवारी रोजी सुट्टी देण्यात आली आहे. त्याच सोबत बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 व शासनाने प्रचलित आदेश निगम मार्गदर्शक सूचना यानुसार आवश्यक 230 किमान शैक्षणिक दिवस शाळेचे कामकाज होईल या अटीच्या अधीन राहून शाळांच्या सुट्ट्यांचे नियोजन व त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय पालक शिक्षक संघाच्या बैठकीत मान्य केला जावा आणि या अटीचे उल्लंघन होणार नाही याची प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी असं सूचित केले आहे .

वाहतुकीत बदल जिजाऊ सृष्टीवर महाराष्ट्रातून येत असलेल्या जनसमुदायाची संख्या लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी आज दिनांक 11 रोजी मध्यरात्रीपासून ते दिनांक 13 रोजी च्या मध्यरात्रीपर्यंत सिंदखेड राजा चौफुली पासून वाहतुकीत बदल केले आहेत. त्यानुसार सिंदखेड राजाकडे जाणारी वाहतूक जालन्यातील कन्हैया नगर चौफुली मार्गे देऊळगाव राजा, चिखली ,मेहकर वाशिम कडे जाईल किंवा कन्हैया नगर ,देऊळगाव राजा, अंढेरा मलकापूर पांगरा, मार्गे दुसर बीड मेहकर वाशिम कडे जाईल.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button