Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

रस्ते सुरक्षा नियम ही आपली जीवनशैली बनवा- जिल्हाधिकारी डॉ. राठोड

जालना-रस्ता सुरक्षा नियम ही जीवनशैली बनवा, रस्त्यावर वाहन चालवत असताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने घालून दिलेल्या सप्तसुत्रीचा वापर करा, ही सप्तसुत्री म्हणजे दुचाकी वाहनांच्या अपघाताची प्रमुख कारणे आहेत आणि त्या कारणांमध्ये अति वेगाने दुचाकी चालविणे, नागमोडी वळणे घेत दुचाकी चालविणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, दुचाकी चालविताना मोबाईल वापरणे, दारू प्राशन करून दुचाकी चालविणे, चुकीच्या दिशेने दुचाकी चालविणे ,हात/ किंवा इंडिकेटर चा योग्य वेळी वापर न करणे याचा समावेश आहे. अपघात टाळण्यासाठी याचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये रस्ता सुरक्षा अभियान 2023 या कार्यक्रमाचे उद्घाटन आज झाले त्यावेळी ते बोलत होते. हे अभियान 11 – 17 जानेवारी 23 यादरम्यान राबविले जाणार आहे.या कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केलेल्या रस्ता सुरक्षा साहित्याचे विमोचन करण्यात आले.

अपघातग्रस्तांच्या कुटुंबाचे अनुभव अतिशय विदारक असतात आणि अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या व्यक्तींचे अपंगत्व सोबत घेऊन जगणे ही प्रचंड वेदनादायी असते, त्यामुळे रस्त्यावर नियम पाळून अपघात टाळता येतो असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी केले.

चालकाच्या चुकीच्या सवयी बदलून रस्ता सुरक्षा नियम हे जीवनशैली व सवयीचा भाग बनावे या संकल्पनेवर आधारित सुरक्षित रस्ते समृद्ध जालना या कार्यक्रमाचे सादरीकरण सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले.जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सचिव मधुसूदन कांडलीकर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दोन परतुर, यांनी रस्ते बांधणी विषयक बाबींचे या कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पाटील, वाहतूक विभागाचे  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व मोटर वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, सर्व वाहन वितरक, पीयूसी सेंटरचे संचालक, बारवाले कॉलेज चे एनसीसी ,एनएसएस चे विद्यार्थी, देवगिरी इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, अपघातग्रस्ताचे पालक  लक्ष्मण तुकाराम मदन, एमएसआरडीसी चे श्री. शर्मा तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button