आपल्या पाल्याला जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश पाहिजे? मग ही बातमी वाचा
जालना,दि. 11 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दि. 29 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. यासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरले जात आहेत. जालना जिल्ह्यातील रहीवासी असलेल्या व इयत्ता पाचवी वर्गात सन 2022-23 मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची नोंदणी सेवा केंद्रावरुन व इतर यंत्रणेचा वापर करुन ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य शैलेश नागदेवते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी -2023 साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी पाचवीच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणपत्र भरुन घ्यावेत व त्यावर विद्यार्थ्याचा फोटो, स्वाक्षरी व पालकांची स्वाक्षरी करुन सदर प्रमाणपत्र हे मुख्याध्यापकद्वारे सत्यपित/प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची जाहिरात, माहितीपत्रक, सुधारीत प्रमाणपत्र इ. www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. फॉर्म भरण्यासाठीचे प्रमाणपत्रे, फोटो, स्वाक्षऱ्या इ. हे 10 ते 100 केबीमध्ये स्कॅन करुन संकेतस्थळ www.navodaya.gov.in यावर भरावेत. विद्यार्थ्यांचा जन्म हा दि. 1 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 या दरम्यानचा असावा.**
नवोदय विद्यालयाचे काही फायदे. प्रत्येक जिल्ह्याला एकच संस्था असते .त्यामुळे इथे प्रवेश मिळण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. केंद्र सरकारचे नियंत्रण .उच्चशिक्षित शिक्षक, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच खेळ, संभाषण, संवाद वेळेचे व्यवस्थापन. त्यासोबत पहाटे पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या साच्यामध्येच नियोजन करावे लागते, त्यामुळे शरीराला शिस्त लागते .व्यक्तिमत्व विकास येथे घडत असल्यामुळे अन्य वेळी अशा प्रकारचा कोर्स बाहेर फी भरून करावा लागतो. इथे प्रवेश झालेले विद्यार्थी मुळातच हुशार असतात आणि प्रवेश झाल्यानंतर काही विद्यार्थी कमकुवत असतील तर त्यांना इतर विद्यार्थी पाहून आपणही त्यांच्याप्रमाणे पुढे जाण्याची प्रेरणा मिळते .इथले नियम व अटी इतर शाळेच्या तुलनेत वेगळे असतात, अभ्यासक्रमाही वेगळा असतो.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com