Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

मेल्विन जोन्स यांच्या पोस्टल तिकिटाचे अनावरण

जालना-लॉयन्स क्लब इंटरनॅशनलचे संस्थापक स्व. मेल्विन जोन्स यांच्या वाढदिवसानिमित्त प्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रांताचा लोगो आणि स्लोगन असलेल्या पोस्टल तिकिटाचे विमोचन आज शुक्रवार दि. 13 जानेवारीला करण्यात आले. ज्येष्ठ सदस्य तथा उद्योजक एमजेएफ सुरेश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.


200 देशात 14 लाख सदस्यांमार्फत गेल्या 105 वर्षापासून लायन्स क्लब सामाजिक उपक्रम राबविण्यासह सेवा कार्य करत आहे. लॉयन्स इंटरनॅशनलचे संस्थापक मेल्विन जोन्स यांचा वाढदिवस 13 जानेवारी रोजी जगात विविध सामाजिक सेवा कार्याच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. लायन्स इंटरनॅशनलचे महत्वपूर्ण अंग असलेल्या 3234 एच – 2 या मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्याचे नेतृत्व यावर्षी प्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया हे करत असून, त्यांच्या संकल्पनेतून मेल्विन जोन्स यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय डाक विभागाच्या परवानगीने प्रांताचे स्लोगन “क्रॉस द लाईन” आणि प्रांतीय पिन अधोरेखित हॅपी बर्थडे असा उल्लेख असलेल्या पोस्ट तिकिटाचे विमोचन एमजेएफ लॉ. सुरेश अग्रवाल यांच्याहस्ते आणि प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, भारतीय पोस्ट विभागाच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे जनसंपर्क अधिकारी संजय पाटील, सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. आंबुलकर, प्रांतीय सचिव लॉ. अरुण मित्तल, लॉ. सुभाष देविदान, सहज सतपुते, लॉ. सुभाष देवीदान, जीएटी समन्वयक लॉ. अतुल लड्ढा, लॉ. सुनील बियाणी, लॉ. कमलकिशोर बगडिया, लॉ. जयश्री लड्डा, लॉ. सुशील पाण्डेय, लॉ. विनोद कुमावत, लॉ. द्वारकादास मुंदड़ा, लॉ. नंदकिशोर अग्रवाल, लॉ. रामनारायण अग्रवाल, रामेश्वर अग्रवाल आदींची उपस्थिती होती.***

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button