त्याच पुढे काय झालं? तो कुंटणखाना अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार होणार सील?
जालना- उच्चभ्रू वस्तीमध्ये वेश्याव्यवसाय सुरू करून सामान्य नागरिकाच्या प्रतिभेशी खेळणाऱ्या या व्यवसायाच्या ठिकाणाला प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच या ठिकाणाला सील ठोकण्यात येण्याची शक्यता आहे.
जुन्या जालनातील शिवनगर भागामध्ये कॉलेजंग इमारतीमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. यासंदर्भात अनेक वेळा पोलिसांना तक्रारी देऊनही कारवाई होत नव्हती, शेवटी या परिसरातील नागरिकांची प्रतिभा मलिन होऊ लागली त्यामुळे नागरिकांनी थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला आणि तक्रार केली. या तक्रारीची दखल घेण्यापूर्वीच वेश्या व्यवसायाचा अड्डा चालवणाऱ्याने आपले बस्तान हलवले आणि विद्युत कॉलनी भागात एक घर घेऊन लगेच हा व्यवसाय सुरू केला. नवीन सुरू झालेल्या या व्यवसायावर पोलिसांची नजर होतीच. दिनांक 25 नोव्हेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या पथकाने छापा मारून चार ग्राहक आणि दोन तरुणींना पकडले होते. त्यामुळे सर्वत्र विद्युत कॉलनी चे नाव खराब होऊ लागले. हा प्रकार ताजा असतानाच पुन्हा पाच जानेवारी रोजी इथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची कुणकुण कॉलनीतील नागरिकांना मिळाली. आणि त्यांनी पुन्हा पोलिसांना बोलावून चौघा जणांना रंगेहात पकडून दिले. यावेळी व्यवसाय करणाऱ्या तरुणी पळून जाण्यात यशस्वी झाल्या होत्या.
दरम्यान उच्चभ्रू वस्तीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळे कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर यांनी पहिल्याघटनेनंतर लगेच या ठिकाणाला प्रतिबंध करण्याची मागणी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडे केली होती. परंतु कारवाई होण्यास विलंब झाला.
दरम्यानच्या काळात पोलिसांना पुन्हा एकदा 5 जानेवारीला दुसरा छापा मारावा लागला. त्यामुळे या ठिकाणाचे दुष्परिणाम आणि ठिकाणापासून जवळच असलेल्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर दुष्परिणाम होणार आहेत.याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांना या ठिकाणावर पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या शिफारशीनुसार आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 18 प्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार आता लवकरच विद्युत कॉलनीतील आरोपीच्या मालकीचे सर्वे नंबर 446 प्लॉट क्रमांक 60 चा नगर भूमापन क्रमांक 69 92/अ 38 ज्याचं एकूण क्षेत्रफळ 150 चौरस मीटर आहे आणि ते सार्वजनिक ठिकाणापासून दीडशे मीटर अंतरावर असल्यामुळे या ठिकाणी कलम 18 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई करावी त्यामुळे लवकरच या जागेला सील लागण्याचे संकेत आहेत.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com