1.
Jalna Districtजालना जिल्हा

पतीच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर लागलेल्या महिला पोलिसाचा अपघातात मृत्यू ;मुलगा गंभीर जखमी

राजूर -राजूर भोकरदन मुख्य रस्त्यावर दुचाकीची बैलगाडीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात एका महिला कॉन्स्टेबल चा जागीच मृत्यू झालाआहे. मृत महिला  कॉन्स्टेबल यांचा  चा 18 वर्षाचा मुलगा यात गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दि .15 सकाळी दहा वाजता घडली.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की जालना पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल सुनीता ढोबाळ(वय 40) या आपले मूळ गाव इब्राहिमपूरवरून (ता.भोकरदन) आपल्या मुलासोबत जालना येथे कर्तव्यावर जात असताना भोकरदन रोडवरील राजूर येथील आराध्य मंगलकार्यालया समोर बैलगाडीच्या धडकेने हा भीषण अपघात झाला.या घटनेची माहिती मिळताच राजूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.श्रीमती ढोबाळ या पतीच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर 2017 मध्ये पोलीस खात्यात रुजू झाल्या होत्या.त्यांना दोन मुले व एक मुलगी असून त्यांच्या निधनाची बातमी कळताच जालना पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली.***

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button