चांगल्या कामांचे बक्षीस मिळाले! “DHO” नां आता ही आहेत आव्हाने?

जालना-निती आयोगाच्या पाच संकेतानुसार जालना जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात चांगली कामगिरी बजावल्याबद्दल नुकत्याच रिक्त झालेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांची प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कदाचित एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 मध्ये निती आयोगाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा शासनाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला होता, आणि कदाचित आता जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचे हे बक्षीस दिले असावे!. चांगल्या कामाचे बक्षीस जरी मिळाले असले तरी भविष्यामध्ये जालना जिल्ह्यात पुरुष नसबंदी, तांबी बसवणे, गर्भनिरोधक गोळ्यांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रवृत्त करणे हे तीन आव्हान डॉ.जयश्री भुसारे यांच्यासमोर असणार आहेत. त्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेमध्ये 50% वरून 70% च्या वर जिल्ह्याची आकडेवारी वाढवून नेणाऱ्या डॉ. भुसारे या ही तीन आव्हाने पूर्ण करतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ग्रामीण भागातील आरोग्याचे मूल्यमापन करण्यासाठी नीती आयोग काही इंडिकेटर्स ठरवून देते त्यानुसार जालना जिल्ह्याला ,बारा आठवड्याच्या गर्भवती असलेल्या गरोदर मातांची नोंदणी करणे, आणि गरोदर मातांच्या चार तपासण्या करण्याचे 41 हजारांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी 96% उद्दिष्ट हे पूर्ण झाले आहे तसेच 38 हजार महिलांची प्रसुतीची नोंदणीचे उद्दिष्ट होते ते 93 टक्के पूर्ण झाले आहे आणि एवढेच उद्दिष्ट ज्या बालकांचे बारा डोस पूर्ण झाले आहेत त्यांच्या नोंदणीचे होते हे उद्दिष्ट देखील 99 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे पूर्वी राज्यामध्ये 29 व्या क्रमांकावर असलेला जालना जिल्हा एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 मध्ये निती आयोगाने ठरवून दिलेल्या संकेतानुसार 21 व्या क्रमांकावर आला आहे. वरील तिन्ही बाबींमध्ये जालना जिल्ह्याचा खालून पहिला क्रमांक आहे त्यामुळे भविष्यात माता बाल संगोपनाच्या जबाबदारी सोबतच या तीनही कार्यक्रमांवर विशेष लक्ष केंद्रित करून जालना जिल्ह्याचा क्रमांक वर आणण्याचे आव्हान डॉ. जयश्री भुसारे यांच्यासमोर आहे दोन.3 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कोविडच्या काळातच श्रीमती भुसारे या जालना जिल्हा परिषदेच्या माता व बालसंगोपन अधिकारी म्हणून बदलून आल्या होत्या. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांचे मागील महिन्यात निलंबन झाल्यानंतर या पदासाठी चार जण जिल्हा परिषदेमध्ये पात्र होते. त्यापैकीच डॉ. जयश्री भुसारे या एक आहेत. दरम्यान त्यांना हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी डॉ. सलमा हिरानी, डॉ. गजानन मस्के, डॉ. पुरुषोत्तम नागदरवाड, आणि आरोग्य सहाय्यक रवींद्र सोनार यांच्यासह यांच्यासह या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com