क्रिप्टो करेंसी(GDC) चा जालन्यात धुमाकूळ; काही झाले मालामाल तर काही झाले कंगाल. जीडीसी कॉइन संदर्भात “तेरी भी चुप मेरी भी चुप” मोठे गुन्हे घडण्याचे संकेत. राजकीय मंडळीची मोठी गुंतवणूक ?
.जालना -“क्रिप्टो करेंसी” म्हणजे आभासी चलन( क्रिप्टो म्हणजे गुप्त आणि करन्सी म्हणजे चलन) जे प्रत्यक्षात हातात येत नाही मात्र डिजिटल माध्यमातून वापरल्या जातं, आणि “जीडीसी” (गोल्ड डिजिटल कॉइन/ कॅश ) अशा या क्रिप्टो करन्सीने सध्या जालना जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. अनेक जण मालामाल झाले आहे तर मालामाल झालेल्या पेक्षा कंगाल झालेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून जालन्यामध्ये गुंतवणूक करून नुकसान झालेल्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याच संतापाच्या भरात काल घनसांवगी तालुक्यात होत असलेला मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे तूर्तास दबलेले हे प्रकरण पुन्हा कधीही उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
साधारण वर्षभरापूर्वी जालना जिल्ह्यामध्ये क्रिप्टो करन्सी ने शिरकाव केला.या आणि पाहता पाहता डॉक्टर, राजकीय मंडळी, दिग्गज खेळाडू , सामान्य नागरिक हे या क्रिप्टो करेंसी च्या जाळ्यात अडकले. एका मध्यस्थच्यामार्फत साडेतीन हजार रुपयांचे लाख रुपये मिळतील अशा प्रकारची ही करन्सी म्हणजे चालन आहे. या चालनावर शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात हे चलन दिसतही नाही आणि कोणाला मिळतही नाही. हे चलन म्हणजे फक्त एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर जमा खर्च करण्याचे चलन आहे. एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर ती त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल तरच खरेदी करता येते आणि शासन दरबारी हे कुठेही वैद्य नाही. त्यामुळे फसणूक झाली तरी कुठेही दाद देखील मागता येत नाही .अशा या व्यवहारामध्ये बिटकॉइन नावाचा एक प्रकार आहे. हा व्यवहार केल्यानंतर मध्यस्थ्याला ठराविक कमिशन मिळते.
बिटकॉइन आठ-दहा महिन्यांपूर्वी बाजारामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर साडेतीन हजार रुपयांमध्ये उपलब्ध होते आणि ते 25 डिसेंबर 2022 रोजी अधिकृतपणे डिजिटल चलनात येणार होते. त्यामुळे जिल्ह्यातील झटपट आणि रातोरात श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या आणि अमाप पैसा असणाऱ्या अनेकांनी आणखी एक गुंतवणुकीचा मार्ग म्हणून या क्रिप्टो करन्सी मध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली.
सामान्य माणसांनी पतसंस्थेमध्ये सोने गहाण ठेवून त्याचे कर्ज घेतले आणि तो पैसा या क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवला, शासकीय कर्मचाऱ्यांनी खोटी वैद्यकीय बिले देऊन मिळालेला पैसा या करन्सी मध्ये गुंतवला, 25 डिसेंबरला हे गोल्ड कॉइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर साडेतीन हजार रुपयांमध्ये आठ महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या या गोल्ड कॉइन ची किंमत एक लाख रुपयांपर्यंत गेली. त्यामुळे करोडो रुपये डिजिटल प्लॅटफॉर्मवर जमा झाले आणि ग्राहकांची मागणी वाढली आणि एक लाख रुपयांचे कॉईन घेणारे कोणी राहिले नाही त्यामुळे या कॉइन ची किंमत घसरली आणि सध्या ती दीड हजारावर आली आहे. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी साडेतीन हजार रुपयांना एक याप्रमाणे हजारो कॉइन घेणाऱ्या गुंतवणूकदारांचा फायदा तर झालाच नाही उलटे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्यांनी ही गुंतवणूक केली होती असे अनेक गुंतवणूकदार कंगाल होण्याची स्थिती आहे. परंतु ज्यांनी थोडी गुंतवणूक केली आणि त्याचे लाख लाख रुपये आले त्यावेळेस त्यांनी हे विकून टाकले आणि मोकळे झाले. परंतु ज्यांनी हे विकले नाहीत ते मात्र कंगाल होत आहेत. साडेतीन हजाराचे एक लाख रुपये झाले या एक लाख रुपयांवरून पुन्हा घसरण झाली ते 50हजारावर आले 50 हजारावरून दीड हजारापर्यंत आले आणि प्राप्त माहितीनुसार आता त्याची किंमत दोन रुपये झाली असल्याचे सांगण्यात येत आहे . त्यामुळे साडेतीन हजाराचे साडेतीन हजार मिळणे तर सोडाच मात्र त्याचे दोन रुपये मिळत असल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .दरम्यान आता पुन्हा कधी या गोल्ड कॉइन चा भाव वाढेल याकडे सर्वांचे लक्ष आहे .
दरम्यान याच गुंतवणुकीच्या प्रकारामधून काल घनसांवगी तालुक्यात एक ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. यामध्ये ज्या व्यक्तीच्या मार्फत हा पैसा गुंतवला होता त्याचे आणि गुंतवणूकदाराचे मोठे भांडण होण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तूर्तास हे भांडण मिटले आहे मात्र भविष्यात हा वाद पुन्हा कधीही उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
*असा चालतो गोल्ड कॉइन चा व्यवहार *
क्रिप्टो करेंसी हे फक्त डिजिटल मीडियावर सर्व देशात सध्या चालत आहे. भारतामध्ये याला सरकारची मान्यता नाही आणि रोख म्हणजे कागदी नोटा किंवा शिक्का दिसत नाही. हा सर्व प्रकार डिजिटल वरच चालू असतो .याच्यावर सरकारचे नियंत्रण नाही त्यामुळे विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये एक साखळी असते या साखळीला एक कंपनी ज्याला ब्लॉगचेन म्हणतात ती नेटवर्क मार्फत एक टोकन देऊन हा सर्व व्यवहार पारदर्शकपणे चालवते. एका खाते नंबर वर हा सर्व व्यवहार चालतो आणि एकदा विसरलेला खाते नंबर पुन्हा मिळवता येत नाही. परंतु संगणकावर एकदा पक्का झालेला नंबर तो ग्राह्य धरला जातो. सन 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये अशा प्रकारच्या व्यवहारात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे .त्यामुळे प्रत्येकाला झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून ही क्रिप्टो करन्सी दिसायला लागली आहे .या व्यवहाराची शासन दरबारी कुठेच नोंद नाही बँक देखील अशा व्यवहारा संदर्भात कर्ज उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे याची तक्रारही कुठे करता येत नाही .अशा या क्रिप्टो करेन्सी अर्थात जीडीसी मध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये सध्या असंतोष खदखदत आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारामार्फत हा व्यवहार केला गेला आहे अशा मध्यस्थ्याला जबाबदार धरल्या जात आहे आणि त्यातून भविष्यामध्ये मोठे वाद होण्याचे संकेत सध्या मिळत आहेत. सध्या परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार आणि मध्यस्थी या दोघांचीही परिस्थिती म्हणजे “तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी झालेली आहे.”***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com