Jalna Districtजालना जिल्हाराज्य

शिंदे साब आप इतने अच्छे है! और आपके आदमी जालना का बिहार कर रहे है?-आ. कैलास गोरंट्याल यांची पूर्ण पत्रकार परिषद पहा

जालना -जालना शहराचे बिहार केल्याचा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या परिवारावर आणि नातेवाईकांवर केला आहे .

दरम्यान सध्या क्रिप्टो करेंसी अर्थात जीडीसी संदर्भात माजी मंत्री अर्जुन खोतकर त्यांचे जावई क्रिकेटपटू विजय झोल यांचा परिवार आणि या दोन परिवाराच्या विरोधात अंबड चे माजी आमदार तथा भाजपाचे नेते विलास खरात यांचे पुतणे किरण खरात यांच्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून देण्याघेण्याचे मोठे वाद सुरू आहेत.  त्यामुळे किरण खरात यांची मालमत्ता आपल्या नावावर करावी म्हणून झोलपरिवार प्रयत्नशील आहे. यातूनच किरण खरात यांच्या घरी गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न खोतकर आणि झोल परिवार करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे हे चांगले मात्र, त्यांच्या गटाचे हे नेते जालन्याचे बिहार करीत आहेत,आणि हा सर्व प्रकार  आपण मुख्यमंत्री शिंदे यांना सांगणार असल्याचेही आ. गोरंट्याल म्हणाले. यासंदर्भात आमदार गोरंट्याल यांनी सुरुवातीला जालना येथील कदीम जालना पोलीस ठाणे आणि त्यानंतर घनसावंगी पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, आणि सायंकाळी जालना येथे पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले. पत्रकार परिषदेत केलेले आरोप जशास तसे तुमच्या पर्यंत.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button