आमदार गोरंट्याल खोटं बोलतात त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- माजी मंत्री खोतकर; क्रिप्टो करेंसी चा मोरक्या पुण्यातील इरफान
जालना- क्रिप्टो करेन्सी आणि त्या संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले वाद-विवाद. दिनांक 16 जानेवारी रोजी यासंदर्भात परस्परविरोधी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले गुन्हे, तसेच आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेऊन क्रिप्टो करेंसी चे प्रमोटर किरण खरात यांची केलेली पाठ राखण आणि माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासह त्यांचे जावई क्रिकेटपटू विजय झोल यांच्यावर केलेले आरोप, यासंदर्भात आज माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि क्रिप्टो करेंसी चा हा सगळा व्यवहार पुणे येथील इरफान नावाचा व्यक्ती करत असल्याची माहिती ही त्यांनी दिली.
आमदार कैलास गोरंट्याले खोटे बोलत आहेत किरण खरात यांनी दिलेल्या तक्रारीत कुठेही गोळीबार झाल्याचे त्यांनी म्हटले नाही .असे सांगत पारिवारिक टीका करणे योग्य नाही, आम्हाला काही कळत नाही असे नाही, असे सांगून गोरंट्याल यांच्या मुलाचे जमलेले लग्न मोडले होते मात्र कसेतरी पुन्हा ते जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले .दरम्यान माजी मंत्री अर्जुन खोतकर काय म्हणाले पत्रकार परिषद ती पत्रकार परिषद जशी झाली तशी आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा Edtv News चा हा प्रयत्न.**
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com