Jalna Districtजालना जिल्हाराज्य

क्रिप्टो करेंसी प्रकरण ;मला वैरीही खानदानी पाहिजे-आ.गोरंट्याल;राजकीय वैर पोहचले खानदानी पर्यंत

जालना- आपण ज्या “संसार परिवार”साठी  राब -राब राबतो त्याच “संसार परिवारने” अवघ्या दोन वर्षात सुरू झालेल्या क्रिप्टो करेंसी ने जालना जिल्ह्यात अनेकांचे या “संसार परिवार” उध्वस्त केले आहेत.

गुंतवणूकदार आणि प्रमोटर यांच्यातील वाद राजकीय ठरवू लागलेले आहेत. आता हे वाद फक्त राजकीयच नाही तर दोन परिवारातील कटूता वाढवून खानदानापर्यंत गेले आहेत. क्रिप्टो करेंसी प्रमोटर आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे जावई क्रिकेटपटू विजय झोल यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृतपणे या नावाचा उल्लेख केला आणि त्या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. त्यानंतर काल दिनांक 17 रोजी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ,आमदार गोरंट्याल यांच्या मुलाचे लग्न मोडले होते मात्र पुन्हा कसेबसे जोडल्या जात आहे असा पलटवार केला होता. त्यामुळे आता या दोघांचे भांडण राजकीय भांडण न राहता ते खानदान पर्यंत पोहोचले आहे. आज पुन्हा आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेऊन “मला वैरीही खानदानी पाहिजे “अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि माजी मंत्री खोतकर यांना परिवारातील अनेक किस्से बाहेर काढण्याचा गर्भित इशाराही दिला आहे .त्यामुळे क्रिप्टो करेंसी चा वाद हा एका बाजूला झाला आहे आणि या दोन राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे वाद आता वाढवायला लागले आहेत. आर्थिक गुंतागुंत जशी वाढत आहे तशीच आताही खानदानी गुंतागुंत देखील वाढायला लागली आहे. परंतु आर्थिक गुंतागुंत सोडवण्यासाठी किंवा त्याचा निर्णय करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि न्यायालय आहेत ,मात्र या खानदानी गुंतागुंतीचे काय? हा सर्वसामान्यांना आता प्रश्न पडायला लागला आहे.***

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button