मधुमेह संदर्भात न्यायालयात मार्गदर्शन
जालना -दिवसेंदिवस वाढत जाणारा मधुमेह, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय या विषयावर शहरातील निरामय हॉस्पिटलच्या वतीने” मधुमेहाचे समज व गैरसमज” या विषयावर न्यायालयातील न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, निरामय हॉस्पिटल आणि अंजानी फाउंडेशन च्या वतीने दिनांक 12 रोजी हा उपक्रम पार पडला. दिनांक 13 जानेवारी हा निरामय हॉस्पिटल चा वर्धापन दिन देखील होता. त्यानिमित्ताने आठ वर्षे पूर्ण करून नवव्या वर्षात पदार्पण करण्याच्या निमित्ताने देखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती देव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सचिव प्रतिभा भारसाकडे- वाघ डॉक्टर पद्माकर सबनीस ,ज्योती आडेकर ,श्रीमती विद्या जाधव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. डॉ. सबनीस यांनी मधुमेहाविषयीचे समज व गैरसमज याविषयी मार्गदर्शन केले तर श्रीमती भारसाकडे यांनी दैनंदिन न्यायालयीन कामकाज करीत असताना कामाच्या व्यस्ततेमुळे शरीराकडे लक्ष देणे होत नाही, पर्यायाने इस्पितळात जाऊन वेळोवेळी तपासणी देखील करणे शक्य होत नाही, त्यामुळे न्यायालयाच्या आवारातच आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी आयोजकाचे आभार मानले.**
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com