Jalna Districtजालना जिल्हा

घरात ई( इलेक्ट्रॉनिक)कचरा साचलाय! मग या नंबर वर करा फोन

जालना -नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे घरातील जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती बंद झाली आहे. जुनी वस्तू खराब झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेच दुसरी अत्याधुनिक नवी वस्तू यायला लागली आहे त्यामुळे घरामध्ये असलेला ई(इलेक्ट्रॉनिक) कचरा म्हणजेच नादुरुस्त असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ढिगारा साचलेला आहे. हा ढिगारा प्रदूषणाला हानिकारक असल्यामुळे त्याची विल्हेवाटही लावता येत नाही, आणि त्याला बाजारात कोणी विकतही घेत नाही. अशा परिस्थितीत या कचऱ्याचे करायचे काय? या प्रश्नाला लायन्स क्लब ने उत्तर दिले आहे.

या ई-कचऱ्याचे संकलन सध्या नवीन मोंढा रस्त्यावर “महाराष्ट्र ट्रेड फेअर” चालू आहे या ठिकाणी लायन्स क्लबच्या वतीने ई कचरा संकलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्यांच्या घरामध्ये जुन्या आणि नादुरुस्त वस्तू (tv, मोबाईल,हेडफोन,टेपरेकॉर्डर, cd प्लेयर,आदी.)आहेत ज्या उपयोगात येत नाहीत आणि फेकताही येत नाहीत अशा वस्तू संबंधितांनी इथे आणून द्याव्यात असे आवाहन लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान ज्यांना त्या वस्तू इथे आणून देणे शक्य नाही त्यांच्यासाठी रविवार दिनांक 22 रोजी घरोघरी जाऊन हा ई कचरा संकलन मोहीम राबवली जाणार आहे. ज्यांच्या घरी, ज्यांच्या दुकानात असा ई कचरा साचला आहे त्यांनी 94 222 15 591 या नंबर वर अतुल मित्तल यांच्याशी संपर्क साधून जमा असलेल्या कचऱ्याची माहिती द्यावी जेणेकरून ही टीम घरी येऊन हा कचरा घेऊन जाईल .जमा केलेल्या या ई कचऱ्यातील चांगल्या वस्तूंचा पुनर्वापर केला जाईल तर खराब वस्तूंची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावल्या जाणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ जालनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button