आनंद नगरीत विद्यार्थी आनंद लुटण्यात मग्न
वाटुर फाटा- परतुर तालुक्यातील वाटूर फाटा येथील शंभू महादेव विद्यामंदिर शाळेतील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 21 रोजी सकाळी नऊ वाजता आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते.
त्या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक शाळेचे प्राचार्य श्री, आदमाने सर यांच्या हस्ते झाले,तसेच या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शाळेतील प्राध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
आनंद नगरीमध्ये 60 ते 65 स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्टॉल लावून मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता, त्यामध्ये जवळपास 70 ते 75 हजार रुपयाची उलाढाल झाली असल्याची माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली, याप्रसंगी गावकऱ्यांनी कार्यक्रम पाहून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्व पदार्थाची खरेदी केली व कौतुक केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्काऊट गाईड चे शिक्षक राठोड बि,आर राठोड के डी सर, आणि शिक्षिका वानखेडे मॅडम शिंदे मॅडम वावरे मॅडम व मुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष श्री,मा,आमदार धोंडीराम भाऊ राठोड आणि विधानपरिषद आमदार राजेश भैय्या राठोड यांनी शुभेच्छा दिल्या..
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com