श्री.श्री.रविशंकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 फेब्रुवारीला जालन्यात; शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन
जालना- जालना, परतुर आणि मंठा तालुक्यात श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रामार्फत झालेल्या जनसंवर्धनाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग चे गुरुदेव श्री. श्री. रविशंकर हे गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जालना जिल्ह्यातील वाटूर येथे येत आहेत.
या संदर्भात आर्ट ऑफ लिव्हिंग चे वरिष्ठ प्रशिक्षक पुरुषोत्तम वायाळ यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य जय मंगल जाधव आणि शरद गर्ग यांची उपस्थिती होती.दरम्यान यावेळी बोलताना श्री. वायाळ म्हणाले की गेल्या दोन वर्षात 37 गावांमध्ये याचे फायदे दिसून आले आहेत. पंचवीस वर्षांपासून कोरडवाहू असलेली शेती पाण्याची पातळी वाढल्यामुळे आज बागायतदारांची शेती झाली आहे. त्यामुळे तीन ते चार पिके हे शेतकरी घेत आहेत आणि पर्यायाने आर्थिक स्थर उंचावण्यासोबतच व्यसनमुक्ती, तंटामुक्ती हे देखील या भागात कमी झाले आहे. एक एकर शेतीसाठी एक जलतारा या माध्यमातून 50 गावांमध्ये वीस हजार जलतारा पीठ बनवले आहेत, आणि या जलतारांवर 40 हजार वृक्षांची लागवड केल्याचा दावा देखील वायाळ यांनी केला आहे. दरम्यान भविष्यामध्ये जालना, मंठा आणि परतूर तालुक्यातील 245 गावांमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले. श्री श्री रविशंकर यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहेत, आणि राज्यभरातून सुमारे 30 हजार शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला आहे.**
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com