Jalna Districtजालना जिल्हा

“गुपचूप”सुरू असलेल्या गुपचूपच्या कारखान्याला आग

जालना -आंबड रस्त्यावर असलेल्या माऊली नगर भागात आज सकाळी “गुपचूप” पणे सुरू असलेल्या एका गुपचूप च्या कारखान्याला आग लागली. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही. माऊली नगरच्या शेवटच्या टोकाला गेल्या आठ-दहा वर्षांपासून गुपचूप म्हणजे पाणीपुरी तयार करण्याचा कारखाना सुरू आहे. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघून परिसरातील नागरिकांना या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात आज हा कारखाना इतरत्र हलवावा अशी तक्रार बबनआप्पा किसनआप्पा लंगोटे यांनी दिली आहे.

दरम्यान आज सकाळी सात वाजेच्या सुमारास या कारखान्यातील साहित्याला आग लागली .पाणीपुरी तळण्यासाठी तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागत असल्यामुळे काही क्षणातच इथे असलेल्या तेलाने पेट घेतला आणि क्षणार्धात आगीचे लोळ बाहेर पडू लागले. परंतु वेळेतच हजर झालेल्या नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र गुपचूप उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या विजेच्या साहित्याचे व भट्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button