Jalna Districtजालना जिल्हा

मनसेच्या जिल्हाध्यक्षांना शासनाचा पूळका “त्या” अधिकारी आणि शेतकऱ्यांची चौकशी करा

जालना- मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांना शासनाचा पुळका आला आहे .शेततळे देण्यासाठी संगणमत करून पैसे हडप करणाऱ्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि “त्या” पाच शेतकऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान तिथे दखल घेतल्या जात नसल्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा प्रश्न जनतेसमोर मांडला आहे .

 

परतुर तालुक्यात चिंचोली येथील पाच शेतकऱ्यांनी आणि गटविकास अधिकाऱ्यांसह सहाय्यक अभियंता, ग्रामसेवक यांनी संगणमत करून शेततळ्यात शासनाची फसवणूक केल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी केला आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसह ही योजना कागदावर दाखवून फायदा देणाऱ्या आणि घेणाऱ्या या पाचही शेतकऱ्यांची चौकशी करावी अशी मागणीही केली आहे . शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे घेण्यासाठी ऑनलाईन जिओ टॅग चा वापर करावा लागतो ,परंतु असा कोणताही जिओ टॅग न वापरता पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने पाच शेतकऱ्यांना शेततळे देऊन संगणमताने शासनाचे लाखो रुपये लाटले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे .

दरम्यान या पाच शेतकऱ्यांमध्ये भगवान बाबुराव कातारे ,सिद्धेश्वर साहेबराव कातारे, महादेव भुजंगराव टेकाळे, वसंत उत्तमराव चव्हाण, नारायण रंगनाथ सोळंके ,यांचा समावेश आहे .या फसवणुकी सोबतच मंठा नगरपंचायत ला आलेला पाच कोटी रुपयांचा विकास निधी कुठे वापरला? तसेच बागेश्वरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांची लूट ओतल्या होत असल्याचा आरोपही प्रकाश सोळंके यांनी केला आहे.***

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles