शासन नियंत्रित मंदिरातील भाविकांच्या दानाचा चुकीच्या ठिकाणी वापर -सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांचा आरोप
जालना-भाविक आणि धर्माला मानणाऱ्या धार्मिकांनी देवाच्या दानपेटीत, कुंडीत जो निधी टाकलेला आहे तो भाविकांच्या श्रद्धेपोटी दिलेला आहे. परंतु जी देवस्थाने संस्थाने शासनाच्या अधिपत्याखाली येत आहेत अशा ठिकाणी येणारा हा निधी चुकीच्या ठिकाणी वापरला जातो, तो निधी भाविकांनी ज्या कारणासाठी दिला आहे ते कारण म्हणजे धर्मकार्य आहे . या धर्मकार्यासाठीच हा वापरला जावा असे मत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी आज व्यक्त केले.
मंदिरा संदर्भात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सरकार दरबारी कुठेही व्यवस्था नाही, त्यामुळे या मंदिरांची एखादी चळवळ उभी करून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी जळगाव येथे दिनांक चार आणि पाच फेब्रुवारीला “मंदिर परिषद” आयोजित करण्यात आली आहे.
हिंदू जनजागरण समितीच्या पुढाकाराने आणि पद्मालयाच्या सहकार्याने सुमारे पाचशे मंदिरांना आणि सत्तर महंतांना निमंत्रण देण्यात आले आहे.आणि चर्चेतून मंदिरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस हे सध्या मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.
या परिषदेमध्ये सरकार नियंत्रित मंदिरात होत असलेला भ्रष्टाचार थांबविणे, विविध मंदिरांच्या कायदेशीर बाबींची तपासणी करून अडचण असेल तर त्या सोडविणे, पुजाऱ्यांच्या,विस्वस्थ मंडळींच्या अडचणी सोडवून सरकारी यंत्रणा मंदिरापर्यंत पोहोचवणे, याविषयी चर्चांमधून उपाययोजना करण्याचा उद्देश आहे.दरम्यान सध्या सर्व समस्या सोडविण्यासाठी विविध खाते आहेत, परंतु मंदिराची समस्या सोडविण्यासाठी कोणतेही खाते नाही, या समस्या सोडविण्यासाठी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आदि राज्यांमध्ये स्वतंत्र यंत्रणा आहे .तशीच यंत्रणा महाराष्ट्रातही सुरू करावी आणि मंदिरांना न्याय मिळवून द्यावा यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे चेतन राजहंस म्हणाले.या पत्रकार परिषदेला हिंदू जनजागरण समितीच्या जिल्हा समन्वयक कु. प्रियंका लोणे यांचीही उपस्थिती होती.
मंदिरांचे पाच प्रकार. सरकारचे नियंत्रण नसलेले सार्वजनिक म्हणजे वसाहती मधील मंदिर, सरकारी अधिकारी पदाधिकारी असलेले आणि सरकारचे नियंत्रण असलेले मंदिर. एखाद्या सोसायटीने विश्वस्थ मंडळ स्थापन करून बांधलेले मंदिर. ज्यांचे प्रतिनिधी नाहीत असे पडीक, प्राचीन ,दुर्लक्षित, मंदिर आणि ज्या मंदिराचे विश्वस्त किंवा पुजारी हे पारंपारिक पद्धतीने एकाच कुटुंबाकडे आहेत असे मंदिर. अशा मंदिरांच्या बाबतीत पुजारी आणि नित्य कर्मात येणाऱ्या अडचणी, सरकार नियंत्रित मंदिरांच्या अडचणी ,प्राचीन मंदिरांचे पालकत्व, दानपेटी, हुंडी, देवनिधी यांचा विनियोग कसा करावा याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com