ते म्हणाले, त्याला मी काय करू?- माजी मुख्यमंत्री अजित पवार

जालना -ज्याचे त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ते म्हणाले त्याला मी काय करू? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जालन्यात दिले. माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी काही कामानिमित्त श्री. पवार हे आज जालन्यात आले होते.
दरम्यान यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फडणवीसांना गुन्ह्यामध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जो अडकवणार आहे त्या मास्टरमाईंड चे नाव लवकरच जाहीर करू असे सुतवाच भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केले आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? या प्रश्नाला उत्तर देताना श्री. पवार म्हणाले की त्याला मी काय करू? कोण काय म्हणाले याचे उत्तर द्यायला आम्ही मोकळे नव्हेत! प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. काय बोलायचे काय नाही हे ज्याचे त्याने ठरवावे. परंतु जनतेला स्पष्ट बोललेले आवडते. त्यामुळे ज्यांनी हे सुतोवाच केल आहे त्यांनी कोड्यात न बोलता स्पष्ट बोलावं. असे श्री. पवार म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत माझी आरोग्य मंत्री राजेश टोपे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर आदींची उपस्थिती होती.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com