इंग्रजी साहित्य अभ्यासमंडळाचे परभणीत उद्घाटन
परभणी-कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी, इंग्रजी विभागाच्या वतीने “ इंग्रजी साहित्य अभ्यासमंडळाचे उद्घाटन ” नुकतेच करण्यात आले. प्राचार्य, डॉ.वसंत भोसले हे अध्यक्षस्थानी होते तर प्रा. डॉ. करुणा देशमुख, इंग्रजी विभाग प्रमुख तसेच सिनेट सदस्य (स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड) बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत ता. हिंगोली या उद्घाटक तथा साधन व्यक्ती म्हणून उपस्थित होत्या.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्य, डॉ. संगीताआवचार यांनी कार्यक्रमाच्या समन्वयकाची भुमिका बजावली. सुरुवातीला डॉ. श्रीमती आवचार यांनी कार्यक्रमाची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून मांडली. डॉ. वसंत भोसले यांनी इंग्रजी भाषेचे महत्व आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. त्यांनतर प्रा. डॉ. करुणा देशमुख यांनी इंग्रजी अभ्यासमंडळाचे उद्घाटन केले .त्याचबरोबर अभ्यासमंडळातील विद्यार्थीनींचे पुस्तक व पेन देवून स्वागत केले. प्रसंगी ज्या विद्यार्थीनीनी Spoken English चा Certificate Course पूर्ण केला त्यांचे प्रमाणपत्र देवून कौतुक केले. या प्रसंगी बी.ए.द्वितीय वर्षातील विद्यार्थीनींनी ‘Indian Women, First in Their Fields या विषयावरील भित्तीपत्रकाचे मान्यवरांनी विमोचन केले. त्यानंतर प्रो. करुणा देशमुख यांनी ‘Life and Literature या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी विस्तृत मांडणी केली शेवटी डॉ. आवचार यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. ओमप्रभा लोहकरे यांनी केले तर आभार प्रा. माया जमदाडे यांनी मानले.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com