फाटक्या नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने तो करायचा “असे” कृत्य
जालना -जर आपल्या गल्लीमध्ये ,कॉलनीमध्ये फाटक्या नोटा बदलून देण्यासाठी जर कोणी आला असेल तर वेळीच सावध व्हा! कारण असाच एक भामटा जालना तालुका पोलिसांच्या हाती लागला आहे.
शुक्रवार दिनांक 27 रोजी एका आलिशान सुमारे लाख रुपयांच्या एम. एच. 12 एस. डब्ल्यू. 29 60 या क्रमांकाच्या दुचाकीवरून बद्रीनाथ गुप्ता हा 45 वर्षाचा इसम अंबड रोडवर असलेल्या यशवंत नगर भागात जुना नोटा देऊन नवीन नोटा घेण्यासाठी फिरत होता. या दुचाकी वर समोर आणि पाठीमागून ठळक अक्षरांमध्ये “जुन्या नोटा घेणार” अशा ठळक अक्षरांमध्ये फलक लावलेला होता तो फिरत असताना त्याला एका शिक्षकाच्या अंगणामध्ये लहान मुली खेळताना दिसल्या, आणि याच्या अंगातील लिंग पिसाटपणा सुरू झाला, त्याने या मुलींसोबत लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला, या मुलींना जवळ बोलावून त्यांच्या मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले. हा प्रकार मुलींनी वडिलांना सांगितल्यानंतर आज दि.28 च्यापहाटे दोन वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यात या बद्रीनाथ गुप्ताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि कलम 354 आणि कलम 12, बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पिंक मोबाईलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी आरोपीला आज सायंकाळी सात वाजता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आपल्या गल्लीत जर असे कोणी फिरत असेल तर वेळीच सावध होऊन अशा भामट्यावर आणि आपल्या मुलांवर लक्ष ठेवा.**
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com