1.
Jalna Districtजालना जिल्हा

उद्योगधंदे वाढले पाहिजेत नोकरी हे बाय प्रॉडक्ट- डॉ. रमेश पांडव; डॉ. हेडगेवार रुग्णालयाने संशोधनात उतरावे- राजेंद्र बारवाले

जालना-देशाचे भविष्य विकसित करण्यासाठी उद्योगधंदे वाढले पाहिजेत नोकऱ्या हे बाय प्रॉडक्ट आहे .असे मत सामाजिक समरसता अखिल भारतीय मंडळाचे सदस्य डॉ. रमेश पांडव यांनी आज व्यक्त केले. तर डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ने आता संशोधनातही उतरावे अशी अपेक्षा महिको ग्रुपचे चेअरमन राजेंद्र बारवाले यांनी व्यक्त केले आहे. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. दिवाकर कुलकर्णी आणि शहर संघचालक डॉ. नितीन खंडेलवाल यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. पांडव म्हणाले,” आपल्या देशातील गल्लीबोळामध्ये गुणवत्तापूर्ण अनेक गोष्टी आहेत , त्या आपण आत्मसात केल्या पाहिजेत.आपल्या इतिहासाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही,सध्या राष्ट्र म्हणजे काय हे अनेक जण विसरले आहेत !राष्ट्र कशाला म्हणायचे त्या सगळ्या शिकवण्या आपल्याकडे उपलब्ध आहेत, मात्र आपण त्याचा वापर करत नाहीत .जर आपण पुन्हा एकदा या शिकवण्याकडे लक्ष दिले तर बघता -बघता पुढच्या काळात पुन्हा एकदा आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल, आणि राष्ट्र सुजलाम सुफलाम होईल असे ते म्हणाले. दरम्यान राष्ट्राला विकसित करण्यामध्ये उद्योगधंद्यांचे, व्यवसायाचे मोठे महत्त्व आहे . त्यामुळे ते वाढले पाहिजेत नोकऱ्या हे बाय प्रॉडक्ट् आहे.” असेही त्यांनी म्हटले .यावेळी महिको ग्रुपचे चेअरमन राजेंद्र बारवाले यांनी देखील डॉ. हेडगेवार रुग्णालयामार्फत सुरू असलेल्या या उपक्रमाबद्दल कौतुक करून ,रुग्णालयाने आता संशोधनात उतरावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पाश्चात देशाने संशोधन केले आहे, जे चालू आहे त्याचे उपाय आपण करू शकतो, परंतु आपल्यासाठी ते योग्यच असतील असे नाही. त्यामुळे आपणही या संशोधनात उतरावे अशी अपेक्षाही राजेंद्र बारवाले यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ प्रकल्पा अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये आरोग्य सेवेत दोन फिरते दवाखाने जालना शहर आणि ग्रामीण भागात जाऊन आरोग्य सेवा देत आहेत तर महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अल्प दरामध्ये प्रशिक्षणाची व्यवस्थाही या प्रकल्पांतर्गत करण्यात आली आहे. त्यामध्ये सध्या शिलाईकाम आणि ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण दिल्या जात आहे. यासंदर्भात लाभार्थ्यांनी आपले मनोगत ही व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ .सपना गोयल यांनी केले आणि पीपीटीच्या मार्फत माध्यमातून अर्पित अग्रवाल यांनी या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. सौ. शीतल जाफराबादकर यांनी स्वागत गीत गायले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोमीनाथ खाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजेंद्र राठी यांनी मानले.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button