प्रयत्न थांबले तर ते अपयश -डॉ. नितीन खंडेलवाल
जालना- प्रयत्न करत असताना यश आले नाही तर त्याला अपयश म्हणता येणार नाही ,ज्यावेळी सर्व पद्धतीने प्रयत्न करून थांबल्यानंतरच एखाद्या गोष्टीत अपयश आले आहे असे म्हणता येईल. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघ चालक डॉ. नितीन खंडेलवाल यांनी केले.
जालना शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या यादीत अग्रगण्य असलेल्या गोल्डन गुरुकुल शाळेच्या स्नेहसंमेलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे डॉ. ओम अग्रवाल, सुनील अग्रवाल, डॉ. रितेश अग्रवाल, अमित आनंद, डॉ. चंचल आनंद, प्राचार्य डॉ. चोबे यांच्यासह अनेक पालकांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. खंडेलवाल म्हणाले की एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी किंवा तिला टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात परंतु बराच वेळा दोन-तीन प्रयत्न केल्या नंतर अपयश येते आणि आपण अपयश आले आहे असे समजून ते कार्य थांबवतो . खरंतर जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत काम सुरू ठेवले पाहिजे आणि तोपर्यंत अपयश आले असे म्हणता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांना वाव देण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, आणि आपल्या अपेक्षा त्यांच्यावर न लादता स्वतः निर्णय घेण्याची त्यांना संधी दिली पाहिजे, असे झाले तर निश्चितच विद्यार्थ्यांना आणि पालकांना अपयश येण्याची शक्यता कमी असल्याचेही ते म्हणाले.
या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत, छोटा भीम, भांगडा, समुद्रमंथन, आणि विविध विषयांवर नाटिका सादर केल्या. हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी डॉ.जयश्री पवार, ऐश्वर्या साळवे, राहुल चव्हाण ,शकुंतला पाटील, सोनाली गुप्ता ,कार्तिक पित्ती, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नकुल सोळंके आणि सायली सुतार यांनी केले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com